Casita Homes म्हणजे काय रे भाऊ?, एका तासात तयार होतं स्वप्नातलं घर, पाहा VIDEO 

काम-धंदा
Updated Sep 07, 2022 | 20:15 IST

Casita Homes build in one hrs: आपल्या हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. इतकेच नाहीतर आपल्या इच्छेप्रमाणे त्याची निर्मिती करता यावी असंही वाटत असतं. आता हे सहज शक्य होणार आहे ते म्हणजे Casita Homes मुळे.

Casita Homes video: आपलं आलिशान घर बांधण्याचं स्वप्न (dream home) प्रत्येकजण पाहत असतो. हे हक्काचं घर बांधण्यासाठी अनेक महिने किंवा वर्ष सुद्धा लागतात. मात्र, अमेरिकेतील एक अशी कंपनी आहे जी अवघ्या एका तासात घराची निर्मिती करते. जगातील प्रसिद्ध उद्योजक एलन मस्क (Elon Musk) हे सुद्धा अशाच घरात राहतात. या व्हिडिओत जाणून घ्या कॅसिटा होम्स काय आहे?. (What is casita homes)

Casita Homes अमेरिकेतील बॉक्सबेल कंपनी तयार करते. एक घर बांधण्यासाठी जवळपास 40 लाख ते 80 लाखांपर्यंत खर्च येतो. कॅसिटा होम्समध्ये लाकडी फ्लोरिंग आणि एसीसाठी सुद्धा जागा देण्यात आली आहे. वाढती महागाई लक्षात घेता अनेक ठिकाणी लोक आता कॅसिटा होम्सला प्राधान्य देताना दिसून येत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी