खाद्यतेल 15 टक्क्यांनी होऊ शकते स्वस्त, सरकारची महत्त्वाची बैठक

Edible Oil Price: किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी करण्यासाठी सरकार उद्या एक मोठी बैठक घेणार आहे. या बैठकीत सर्व तेल उत्पादक आणि निर्यातदारांना बोलावण्यात आले आहे.

Edible oil can be cheaper by 15 percent, government will hold a big meeting
खाद्यतेल 15 टक्क्यांनी होऊ शकते स्वस्त  

नवी दिल्ली : खाद्यतेलाच्या किमतींबाबत सरकार उद्या मोठी बैठक घेणार आहे. अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले की, सरकार दरांवर सतत लक्ष ठेवून आहे. परिस्थिती लक्षात घेऊन सरकार योग्य तो निर्णय घेईल. आगामी सणासुदीच्या हंगामात तेलाचे भाव लक्षात घेऊन सरकार बैठक घेणार आहे. खाद्यतेलाच्या किमती (Edible Oil Price)आणखी कमी होण्याची शक्यता आहे. ईटी नाऊ स्वदेशला सूत्रांनी दिलेल्या  Exclusive माहितीनुसार एमआरपीमध्ये बदल करण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात. खाद्यतेलाच्या किमतीत १० ते १५ टक्के कपात होऊ शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी