ATM UPI: तुम्हाला पैशांची गरज आहे आणि डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आणायला विसरलात तर अजिबात काळजी करू नका. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) तुमची गरज सहजपणे पूर्ण करेल. जर तुम्हाला हार्ड कॅशची गरज असेल, तर तुम्ही UPI ची मदत घेऊ शकता आणि ATM मधून पैसे काढू शकता. या फिचरला इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल (ICCW) असे म्हणतात. या फिचरमुळे आपल्याकडे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नसतानाही एटीएममधून पैसे काढता येतात. (forgot your atm card dont worry withdraw money from atm with help of smartphone)
UPI ने पैसे काढण्याचे फायदे
अधिक वाचा: Investment Tips: सुरक्षित गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय कोणते? जाणून घ्या...
हे लक्षात घेण्यासारखे आहे की UPI द्वारे एटीएममधून कार्डलेस पैसे काढण्यासाठी कोणतेही पैसे आकारले जात नाहीत. पण, दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरण्यासाठी तुमच्याकडून शुल्क आकारले जाऊ शकते.