IEC 2022 | आरोग्य, शिक्षणापासून ड्रोनपर्यंत सर्वत्र 5G महत्त्वाचे, भारताचे चित्र बदलणार : सुनील मित्तल

Sunil Mittal on 5G : 'इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2022' (India Economic Conclave 2022) या टाइम्स समूहाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला आज मुंबईत सुरूवात झाली आहे. या वर्षीच्या कार्यक्रमाची थीम 'द ग्रेट इंडियन डेमोक्रॅटिक डिव्हिडंड' आहे. 'इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2022' च्या पहिल्याच दिवशी भारती एअरटेलचे चेअरमन सुनील भारती मित्तल या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळेस र्चेदरम्यान त्यांनी सांगितले की 5G सेवा, स्पेक्ट्रम इत्यादींबाबत भाष्य केले.

Sunil Mittal at India Economic Conclave 2022
'इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2022 मध्ये 5G वर बोलताना सुनील मित्तल 
थोडं पण कामाचं
  • टाइम्स समूहाचा 'इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2022' हा मुंबईत कार्यक्रम सुरू झाला आहे
  • भारती मित्तल यांनी 5G वर आपले मत मांडताना सांगितले की, भारताचे चित्र बदलण्यात आणि पुढे नेण्यात ते खूप महत्त्वाची भूमिका बजावेल.
  • त्यामुळे दूरवर बसलेले डॉक्टर अचूक रोबोटिक शस्त्रक्रिया करू शकतील.

Sunil Mittal at India Economic Conclave 2022 : मुंबई :   'इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2022' (India Economic Conclave 2022) या टाइम्स समूहाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला आज मुंबईत सुरूवात झाली आहे. या वर्षीच्या कार्यक्रमाची थीम 'द ग्रेट इंडियन डेमोक्रॅटिक डिव्हिडंड' (The Great Indian Democratic Dividend) आहे. 'इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2022' च्या पहिल्याच दिवशी भारती एअरटेलचे चेअरमन सुनील भारती मित्तल (Sunil Mittal) या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळेस र्चेदरम्यान त्यांनी सांगितले की 5G सेवा, स्पेक्ट्रम इत्यादींबाबत भाष्य केले. 5G सेवांमुळे भारताचे चित्र बदलेल असे यावेळेस मित्तल म्हणाले. देशाच्या अर्थविश्वाशी निगडीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर या प्रतिष्ठित कार्यक्रमात पुढील दोन दिवस विविध क्षेत्रातील दिग्गज चर्चा करतील.  (From health, education to drone, 5G is important everywhere, said Sunil Mittal at India Economic Conclave 2022)

अधिक वाचा : IEC 2022 : आव्हाने स्वीकारून आणि पूर्ण करून भारत प्रगतीपथावर : विनीत जैन, एमडी, टाइम्स ग्रुप

5G सर्वच ठिकाणी महत्त्वाचे

भारती मित्तल, यांनी इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2022 च्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात 5G वर आपले मत मांडताना सांगितले की भारताचे चित्र बदलण्यात आणि पुढे नेण्यात 5G खूप महत्वाची भूमिका बजावेल. 5G आम्हाला सक्षम करेल. इतकेच नाही तर वेगवान इंटरनेट सुविधाही मिळणार आहे. त्याचबरोबर वेगवान सेवेमुळे बरीच कामे दूर बसून करता येतात. त्यामुळे दूरवर बसलेले डॉक्टर अचूक रोबोटिक शस्त्रक्रिया करू शकतील. ड्रोन मॅनेजमेंटपासून ते फ्लाइंग टॅक्सीपर्यंत प्रत्येक गोष्टीत त्याची भूमिका असेल.

अधिक वाचा : IEC 2022 | भारत हा जागतिक कंपन्यांची पहिली पसंती, देशातील गरीबी हटवणे आणि रोजगार निर्मिती आहे महत्त्वाचे : अनिल अग्रवाल

5 G मुळे सर्वकंष विकासाला चालना

स्मार्टफोन आणि बॉडी वेअरेबल्ससाठी लोक बाहेरील सेवा घेऊ शकतील आणि त्यामुळे आरोग्य चांगले राहील. आजकाल शिक्षण, आरोग्य आणि वस्तू खरेदी यांसारखी बरीचशी कामे ऑनलाइन करता येतात. अशा परिस्थितीत चांगली नेटवर्क कनेक्टिव्हिटी देशाला सामाजिक-आर्थिकदृष्ट्या पुढे नेण्यात मदत करेल. हाय-स्पीड आणि कमी विलंबामुळे, लोक होलोग्रामद्वारे कॉन्फरन्ससमोर उभे राहण्यास सक्षम असतील. चर्चेदरम्यान भारती मित्तल म्हणाले की, आपल्या पंतप्रधानांना कनेक्टिव्हिटीचे महत्त्व  नेहमीच समजले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही त्यांना त्याचे महत्त्व लक्षात आले होते.

धिक वाचा : ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येएवढ्या नागरिकांचे भारतात एका दिवसांत लसीकरण : अनुराग ठाकुर

क्रिप्टोकरन्सीचे भविष्यता मोठे महत्त्व

दरम्यान, क्रिप्टोकरन्सीवर बोलताना भारती मित्तल म्हणाले की, क्रिप्टोकरन्सी किंवा डिजिटल मनी हे भविष्य आहे. मात्र, जागतिक स्तरावर त्याचे नियमन आवश्यक आहे. जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल आणि चुकीचे लोक त्याचा फायदा घेऊ शकणार नाहीत. त्यासाठी जगातील सरकारांनी एकत्र येऊन धोरण आखण्याची गरज आहे.

सुनील मित्तल म्हणाले की दूरसंचार कंपन्यांवर स्पेक्ट्रम खर्चाचा बोजा पडू नये. त्याऐवजी 5G सेवा कार्यान्वित करण्यासाठी निधी वापरला जावा. दूरसंचार कंपन्यांवर 5G स्पेक्ट्रमच्या (5G Spectrum) जास्त दराचा भार पडता कामा नये. देशातील दूरसंचार उद्योग आधीच आर्थिक संकटातून जातो आहे. त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की त्यांनी 5G स्पेक्ट्रमचे दर कमीत कमी ठेवावेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी