Gautam Adani at India Economic Conclave 2022 : मुंबई : 'इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2022' (India Economic Conclave 2022) या टाइम्स समूहाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला देशातील सर्वात श्रीमंत आणि आघाडीचे उद्योगपती, अदानी समूहाचे (Adani Group) चेअरमन गौतम अदानी (Gautam Adani) यांची उपस्थिती होती. मुंबईत होत असलेल्या या आर्थिक विषयाशी संबंधित प्रतिष्ठित कार्यक्रमात गौतम अदानींनी देशाची आगामी दिशा कशी असेल यावर भाष्य केले. या वर्षीच्या कार्यक्रमाची थीम 'द ग्रेट इंडियन डेमोक्रॅटिक डिव्हिडंड' (The Great Indian Democratic Dividend) अशी आहे. अदानींनी यावेळी देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी महत्त्वाचे मुद्दे मांडले. देशाची अर्थव्यवस्था रुळावर आल्याचे ते म्हणाले. भारताच्या आगामी वाटचालीबद्दलही त्यांनी आपले मत मांडले. (Gautam Adani apprecited Aatma Nirbhar Bharat Programme at India Economic Conclave 2022)
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी 'स्पेशल अॅड्रेस इंडिया: द बेस्ट अपॉर्च्युनिटी इन द वर्ल्ड' या विषयावर चर्चा केली. अदानी म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसून येत होता. परंतु देशांतर्गत धोरणांमुळे अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आली आहे.
अधिक वाचा : IEC 2022 : आव्हाने स्वीकारून आणि पूर्ण करून भारत प्रगतीपथावर : विनीत जैन, एमडी, टाइम्स ग्रुप
अदानी यांनी सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेचे कौतुक केले आणि देशाच्या उभारणीत या मोहिमेची मोठी भूमिका असल्याचे सांगितले. आगामी काळात देश स्वावलंबी ते भारतावर अवलंबून असा प्रवास करेल. मध्यमवर्गाची ताकद अर्थव्यवस्थेला आणखी गती देणार आहे, असे ते पुढे म्हणाले.
अदानी समूहाचे चेअरमन म्हणाले की, 'आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही आहोत. पण वयाच्या 75 व्या वर्षीही आपण तरुण आहोत.' आपली राज्यघटना खंबीरपणे उभी आहे. आमची क्रयशक्तीची क्षमता म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरीटी ही जगातील क्रमांकाची बनली आहे. आपला जीडीपी 55 पट वाढला आहे. काही लोकांनी आपल्या लोकशाहीला फार गोंगाट म्हटले आहे. पण शांत आणि परिपक्व लोकशाहीपेक्षा तरुण आणि गोंगाट करणारी लोकशाही असणे केव्हाही चांगले. हा आवाज आपल्याला आपले विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य देतो.
अधिक वाचा : ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येएवढ्या नागरिकांचे भारतात एका दिवसांत लसीकरण : अनुराग ठाकुर
अदानी समूहाच्या अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आणि सांगितले की त्यांचा परकी लसींपेक्षा भारतात विकसित होत असलेल्या भारत बायोटेकवर अधिक विश्वास आहे. त्यामुळे ती लस वापरण्यासाठी ते सर्वात आघाडीवर उभे राहिले. हे आत्मनिर्भर असणे आहे. भारत दीर्घकाळ देशांतर्गत उपभोगावरील अर्थव्यवस्था राहील हे वास्तव आहे. स्वावलंबी भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनच्या विस्ताराचा मार्ग मोकळा केला आहे. ही दृष्टी स्वावलंबी भारताकडून 'भारतावर अवलंबून' अशी आहे.
भारत निव्वळ हरित ऊर्जा निर्यातदार बनू शकतो. आम्ही लाखो संधी निर्माण करू. शाश्वतता आणि अपारंपारिक ऊर्जेची गरज ही भारतासाठी गेम चेंजर आहे. सौर ऊर्जा ही सर्वात वेगाने वाढणारी ऊर्जा आहे. गेल्या दशकात त्याच्या किंमती 90 टक्क्यांनी घसरल्या आहेत आणि पुढील दशकातही घसरत राहतील. आपण 2050 पासून 10,000 दिवस दूर आहोत. या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्था 25 ट्रिलियन डॉलर्सची झालेली असेल.