जीएसटीतून मिळालेलं उत्पन्न १ लाख कोटींच्या घरात

काम-धंदा
Updated Jul 13, 2018 | 13:54 IST | ET Now

वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात सरकारने जीएसटीच्या माध्यमातून १,०३,४५८ कोटी रुपये मिळाले आहेत.

GST collection cross Rs 1 lakh crore
जीएसटीमधून १ लाख कोटींची वसुली 

नवी दिल्ली : जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून मोदी सरकारला थोडा दिलासा मिळाला आहे. एप्रिल महिन्यात पहिल्यांदाच जीएसटीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाने १ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. गेल्या वर्षी १ जुलै रोजी जीएसटी (GST) लागू करण्यात आला होता. यानंतर सरकारने एक महिन्यात जीएसटीतून १.०३ लाख कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलं. वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात सरकारने जीएसटीतून १,०३,४५८ कोटी रुपये मिळाले आहेत.

या जीएसटीमध्ये सेंट्रल जीएसटी (CGST)च्या माध्यमातून १८,६५२ कोटी रुपये मिळाले आहेत. तर, स्टेट जीएसटी (SGST) च्या माध्यमातून २५,७०४ कोटी रुपये मिळाले आहेत. आयजीएसटी (IGST) च्या माध्यमातून ५०,५४८ कोटींची कमाई झाली आहे. सरकारने सेस (Cess) लावत ८५५४ कोटी रुपये मिळवले आहेत.

मंत्रालयातून दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात ६०.४७ लाख GSTR 3B रिटर्न फाईल झाले आहेत. मार्च महिन्यात ८७.१२ लाख रिटर्न फाईल करण्यासाठी पात्र होते. १९.३१ कंपोझिशन डिलर्सपैकी ११.४७ लाखने GSTR ४ रिटर्न फाईल्स केले आहेत. यामधून ५७९ कोटी रुपये जीएसटी उत्पन्न मिळालं आहे.

जीएसटी कलेक्शनमध्ये झालेली वाढ आर्थिक स्थिती सुधारल्याने आणि नियम योग्य पद्धतीने लागू केल्यामुळे झाली आहे. मंत्रालयाच्या मते, आर्थिक वर्षाच्ाय शेवटी आलेल्या टॅक्स एरियरमुळेही कलेक्शन वाढलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
जीएसटीतून मिळालेलं उत्पन्न १ लाख कोटींच्या घरात Description: वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात सरकारने जीएसटीच्या माध्यमातून १,०३,४५८ कोटी रुपये मिळाले आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola