HIGHLIGHTS OF THE UNION BUDGET 2023-24:
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प (बजेट) 2023-24 सादर केला. या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत:
भाग अ
सुधारित अंदाज 2022-23:
अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक 2023-24:
कोणती सिगरेट होणार स्वस्त आणि कोणती सिगरेट होणार महाग?
Budget 2023 Highlights:10 Big Points बजेटमध्ये तुमच्यासाठी काय? मोदी सरकारच्या 10 मोठ्या घोषणा
भाग - ब
प्रत्यक्ष कर
नवीन कर दर
Total Income (Rs) | Rate (per cent) |
Up to 3,00,000 | Nil |
From 3,00,001 to 6,00,000 | 5 |
From 6,00,001 to 9,00,000 | 10 |
From 9,00,001 to 12,00,000 | 15 |
From 12,00,001 to 15,00,000 | 20 |
Above 15,00,000 | 30 |
सूक्ष्म उपक्रम आणि काही व्यावसायिकांसाठी प्रस्तावित कर आकारणीचा लाभ घेण्यासाठी मर्यादेत वाढ. वर्षभरात रोख स्वरूपात प्राप्त झालेली रक्कम किंवा एकत्रित रक्कम, एकूण मिळकत /उलाढालीच्या पाच टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तरच वाढीव मर्यादा लागू राहील .
एमएसएमईला केलेल्या खर्चाची वजावट कंपन्याना तेव्हाच मिळेल जेव्हा एमएसएमईला वेळेवर रक्कम मिळेल. यासाठी प्रत्यक्षात देय रक्कम दिली असेल.
31.3.2024 पर्यंत प्रत्यक्ष उत्पादन सुरू करणार्या नवीन सहकारी संस्थांना 15 टक्क्यांच्या कमी कर दराचा लाभ मिळेल, जो सध्या नवीन उत्पादक कंपन्यांना मिळत आहे.
साखर सहकारी संस्थांना 2016-17 च्या मूल्यमापन वर्षाच्या आधीच्या कालावधीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकबाकी म्हणून दिलेल्या रकमेचा दावा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे त्यांना सुमारे 10,000 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.
प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि प्राथमिक सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका कडून रोख ठेवी आणि कर्जासाठी प्रति सदस्य कमाल 2 लाख रुपयांची मर्यादा
सहकारी संस्थांसाठी रोख पैसे काढण्यावरील टीडीएस साठी 3 कोटी रुपयांची कमाल मर्यादा .
स्टार्ट-अप्सना प्राप्तिकर लाभ मिळावा यासाठी स्थापनेची तारीख 31 मार्च 2023 वरून 31 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात येणार
स्टार्ट-अप्सचे भागभांडवल बदलल्यास तोटा पुढे नेण्याचा लाभ स्थापनेपासून सात वर्षे वरून दहा वर्षे करण्याचा प्रस्ताव.
कर सवलती आणि सूट चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यासाठी कलम 54 आणि 54F अंतर्गत निवासी घरामधील गुंतवणुकीवर भांडवली नफ्यातून वजावटीसाठी मर्यादा 10 कोटी रुपये
उच्च मूल्याच्या विमा पॉलिसींच्या उत्पन्नातून प्राप्तिकर सूट मर्यादित ठेवण्याचा प्रस्ताव. 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जारी केलेल्या जीवन विमा पॉलिसींसाठी (ULIP व्यतिरिक्त) प्रीमियमची एकूण रक्कम 5 लाख रुपयांहून अधिक असल्यास 5 लाख रुपयांपर्यंत एकूण प्रीमियम असलेल्या पॉलिसींना सूट दिली जाईल.
गृहनिर्माण, शहरे, नगर आणि खेड्यांचा विकास आणि नियमन, किंवा एखाद्या कामाचे नियमन आणि विकास करण्याच्या उद्देशाने केंद्र किंवा राज्याच्या कायद्यांद्वारे स्थापित प्राधिकरणे, मंडळे आणि आयोगांच्या उत्पन्नाला प्राप्तिकरातून सूट देण्याचे प्रस्तावित आहे.
टीडीएस साठी 10 हजार रुपयांची किमान मर्यादा हटवण्यात येईल आणि ऑनलाइन गेमिंगशी संबंधित करपात्रता स्पष्ट केली जाईल. पैसे काढताना किंवा आर्थिक वर्षाच्या शेवटी जिंकलेल्या रकमेवर टीडीएस आणि करपात्रता तरतुदीचा प्रस्ताव.
सोन्याचे इलेक्ट्रॉनिक सोन्याच्या पावतीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक सोन्याचे सोन्यात रूपांतर भांडवली नफा म्हणून गणले जाऊ नये, असे प्रस्तावित आहे.
पॅन नसलेल्या प्रकरणांमध्ये ईपीएफ मधून पैसे काढल्यास करपात्र रकमेवरील टीडीएस दर 30% वरून 20% पर्यंत कमी केला जाईल
मार्केट लिंक्ड डिबेंचरमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारला जाणार
आयुक्त स्तरावरील प्रलंबित अपीलांची संख्या कमी करावी म्हणून लहान अपील्स निकाली काढण्यासाठी सुमारे 100 सहआयुक्तांची नियुक्ती.
या वर्षी आधीच प्राप्त झालेल्या विवरण पत्रांच्या छाननीसंबंधी प्रकरणे घेताना अधिक चोखंदळ राहणार
IFSC, GIFT सिटी मध्ये पुनर्स्थापित निधीसाठी कर लाभांचा कालावधी 31.03.2025 पर्यंत वाढवला
आयकर कायद्याच्या कलम 276A अंतर्गत लिक्विडेटर्स कडून नियमाचे पालन न झाल्याप्रकरणी त्याला 1 एप्रिल 2023 पासून गुन्हेगार ठरवण्यात येणार नाही.
आयडीबीआय बँकेसह धोरणात्मक निर्गुंतवणुकीतील तोटा पुढील वर्षात दाखवायला परवानगी
अग्निवीर निधीला EEE दर्जा प्रदान करणार. "अग्निपथ योजना , 2022 मध्ये नोंदणी केलेल्या अग्निवीरांना अग्निवीर कॉर्पस निधीतून मिळालेली रक्कम करमुक्त करण्याचे प्रस्तावित आहे . अग्निवीरला त्याच्या सेवा निधी खात्यात त्याने किंवा केंद्र सरकारने केलेल्या योगदानानुसार एकूण उत्पन्नाच्या गणनेतील वजावट देण्याचे प्रस्तावित आहे.
अप्रत्यक्ष कर