नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत देशाचे सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. पहिल्यांदाच पेपरलेस बजेट असेल. अर्थमंत्र्यांनी 'केंद्रीय अर्थसंकल्प मोबाईल' अॅप' लॉन्च केले होते, ज्याद्वारे खासदार आणि सामान्य लोक दोघेही बजेटची कागदपत्रे सहज मिळू शकतात. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थ मंत्रालयात पोहोचल्यानंतर सीतारमण केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्या उपस्थित राहिल्या आहेत . ज्यामध्ये सन 2021-22 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रस्ताव मंजूर केला जाईल. या अर्थसंकल्पात कोरोना साथीच्या आजारामुळे होणार्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करता येतील. अर्थसंकल्पावर समाजातील विविध घटक लक्ष ठेवून आहेत आणि आता निर्मला सीतारमण यांच्या पेटीतून काय पुढे येते ते पहावे लागेल.
आणखी दोन लस देखील लवकरच मिळण्याची शक्यता: निर्मला सीतारमण
Today India has 2 vaccines available and has begun safeguarding not only her own citizens against #COVID19 but also those of 100 or more countries. It has added comfort to know that 2 ore more vaccines are also expected soon: FM Nirmala Sitharaman#UnionBudget2021 pic.twitter.com/OhhgjDQDKq
— ANI (@ANI) February 1, 2021
आज भारतात दोन लस उपलब्ध आहेत आणि त्यांनी केवळ देशातील नागरिकांनाच नव्हे तर 100 किंवा त्याहून अधिक देशांच्या नागरिकांनाच संरक्षण दिले आहे. आणखी दोन लस देखील लवकरच मिळण्याची शक्यता आहे : अर्थमंत्री निर्मला सीतारमण