Investment Tips: सुरक्षित गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय कोणते? जाणून घ्या...

काम-धंदा
Updated Nov 07, 2022 | 21:06 IST

Investment Tips in Marathi: सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी अनेक योजना आहेत. या योजनेत तुम्ही गुंतवणूक करुन आपली आर्थिकस्थिती मजबूत करु शकता.

Secure Investment option: शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे. यामध्ये नफा सुद्धा मोठा असतो मात्र, सुरक्षेची हमी नसते. म्हणजेच शेअर बाजारात तुम्हाला धोका पत्करावा लागतो आणि यासाठी सर्वच तयारी दर्शवतात असे नाही. यामुळेच अनेक गुंतवणुकदार हे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असतात. जेथे त्यांना सुरक्षित गुंतवणुकीच्या माध्यमातून चांगले रिटर्न्स मिळतील. (Investment tips secure option PPF National Saving Certificate Bank FD NPS watch video)

गुंतवणुकीसाठी अनेक सरकारी योजना आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक करुन आर्थिक स्थिती चांगली करु शकता. जाणून घेऊयात कोणत्या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात.

कोणत्या योजनेत किती काळानंतर पैसे दुप्पट होणार?

पीपीएफ

  1. पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय
  2. पीपीएफमध्ये वर्षाला 7.1 टक्के दराने व्याज मिळतो 
  3. या योजनेत पैसे दुप्पट होण्यासाठी 10.14 वर्षे लागू शकतात

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट

  1. एनएससी म्हणजेच नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट एक लहान बचत योजना आहे. 
  2. या योजनेत 6.8 टक्के व्याज मिळतो
  3. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 10.58 वर्षांत पैसे दुप्पट होऊ शकतात

बँक एफडी

  1. RBI ने रेपो रेट वाढवल्यावर FD च्या व्याज दरात बँकांनी केली वाढ
  2. सध्या एफडीवर 6 टक्के व्याज मिळतो
  3. या दराने तुमचे पैसे दुप्पट होण्यास कमीत कमी 12 वर्षे लागू शकतात

National Pension Scheme

  1. सर्व प्रथम या योजने अंतर्गत तुम्हाला खाते सुरू करावे लागेल
  2. सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणारे हे खाते सुरू करु शकतात
  3. या योजनेत पैसे दुप्पट होण्यासाठी 7.2 वर्षांचा कालावधी लागू शकतो

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी