IEC 2022 | एचडीएफसीचे केकी मिस्त्री म्हणतात ऐतिहासिकदृष्ट्या स्वस्त दरात मिळतंय गृहकर्ज, रिअल इस्टेटसाठी ही चांगली वेळ

Keki Mistry on Real Estate : एचडीएफसीचे सीईओ केकी मिस्त्री (Keki Mistry) यांनी आज (22 एप्रिल) टाइम्स नेटवर्कच्या इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2022 च्या (India Economic Conclave 2022) दुसऱ्या दिवशी हजेरी लावली. यावेळी केकी मिस्त्री यांनी रिअल इस्टेट क्षेत्राची स्थिती, व्याजदर यासंदर्भात आपली मते मांडली. केकी मिस्त्री म्हणाले की, 'कोरोना महामारीमुळे घरांची मागणी वाढली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. 2017 ते 2020 या काळात घरबांधणीतही वाढ झाली होती.

Keki Mistry at India Economic Conclave 2022
'इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2022' मध्ये केकी मिस्त्री 
थोडं पण कामाचं
  • केकी मिस्त्री यांनी IEC 2022 मध्ये 'How to Unlock India's Growth Cycle' या विषयावर मते मांडली
  • कोरोना काळात रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी वाढ झाली
  • उच्च उत्पन्नामुळे महागाई देखील वाढली आहे आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे

Keki Mistry at India Economic Conclave 2022 : मुंबई : हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनचे (HDFC)उपाध्यक्ष आणि सीईओ केकी मिस्त्री (Keki Mistry) यांनी आज (22 एप्रिल) टाइम्स नेटवर्कच्या 'इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2022' च्या (India Economic Conclave 2022) दुसऱ्या दिवशी हजेरी लावली. यावेळी केकी मिस्त्री यांनी रिअल इस्टेट क्षेत्राची स्थिती, गृहकर्जाचे व्याजदर यासंदर्भात आपली मते मांडली. केकी मिस्त्री म्हणाले की, 'कोरोना महामारीमुळे घरांची मागणी वाढली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. 2017 ते 2020 या काळात घरबांधणीतही वाढ झाली होती. परंतु ती प्रामुख्याने टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये होती. मुंबई, दिल्ली, बंगळुरू सारख्या टियर 1 शहरांमध्ये, विशेषत: किंमती जास्त असलेल्या ठिकाणी थोडी वाढ झाली होती. (Keki Mistry spoke on real estate sector & interest rates in IEC 2022)

अधिक वाचा : IEC 2022 | कोरोनाचा बूस्टर डोस आवश्यक, नियामक संस्थांनी मंजूरी देताना आधीसारखीच तत्परताच दाखवावी : अदर पूनावाला

रिअल इस्टेट क्षेत्राचे विश्लेषण

कोरोनानंतरच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील परिस्थितीचे विश्लेषण करताना मिस्त्री म्हणाले की, 'कोविडने सर्व काही बदलले आहे आणि लोकांना समजले आहे की मालमत्तेची परवडणारी क्षमता सुधारली आहे. तुम्ही मुंबईत 2017 मध्ये ज्या किंमतीत मालमत्ता खरेदी केली होती तीच किंमत 2020 मध्येही होती. मात्र या ३ वर्षांच्या कालावधीत लोकांचे उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे उत्पन्न वाढल्याने मालमत्ता खरेदी करण्याची क्षमता वाढली. अशा स्थितीत या सेक्टरमध्ये अतिरिक्त पुरवठा होण्याची भीतीही दूर झाली होती. त्यामुळेच अधिकाधिक लोक घर घेण्याचा विचार करत होते. मालमत्तेच्या किंमती कमी असताना लोक घरे खरेदी करत नाहीत, पण जेव्हा तुम्ही किंमती वाढताना पाहता तेव्हा ते खरेदी करायला लागतात. हे सर्व उद्योगांमध्ये घडते.'

अधिक वाचा : IEC 2022 | गौतम अदानी म्हणतात, भारत स्वावलंबी होत, जग भारतावर अवलंबून होण्यापर्यतचा पल्ला गाठणार!

मुद्रांक शुल्कात मर्यादित कालावधीसाठी कपात

व्याजदरात बाबत बोलताना मिस्त्री म्हणाले की, अत्यंत मर्यादित कालावधीसाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्यात आली होती. कदाचित ऑक्टोबर 2020 ते मार्च 2021 (सुमारे 6 महिने) या कालावधीत. मुद्रांक शुल्क 5 टक्क्यांवरून 2 टक्क्यांवर आला होता. कोरोनाच्या काळात व्याजदरात लक्षणीय घट झाली आहे. इतिहासात गृहकर्जावरील व्याज इतके कमी कधीच नव्हते. जरी ते 25 bps, 50 bps किंवा 75 bps ने वाढले तरीही ते भारतात पूर्वी लोक देत असलेल्या व्याजदरापेक्षा कमी असतील.

अधिक वाचा : IEC 2022 | भारत हा जागतिक कंपन्यांची पहिली पसंती, देशातील गरीबी हटवणे आणि रोजगार निर्मिती आहे महत्त्वाचे : अनिल अग्रवाल

जमिनीच्या नव्हे तर उत्पादनांच्या किंमतीत वाढ

मालमत्तेच्या किंमतीत जमिनीचा वाटा सुमारे 70 टक्के आहे. सध्या जमिनीच्या किंमती वाढत नसल्या तरी सिमेंट, पोलाद, मजूर, रंग इत्यादी उत्पादनातील महागाई वाढली आहे. भारतातील लोकांसाठी, कोणत्याही कुटुंबासाठी तुमचे स्वतःचे घर असणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. घराचे मालक असणे तुम्हाला समाधान तर देतेच पण सुरक्षितता देखील देते. पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांचे सरासरी वय 38 वर्षे किंवा 39 वर्षे असते. मला घरांच्या मागणीत संरचनात्मक वाढ दिसत आहे, असे पुढे केकी मिस्त्री म्हणाले

सरकार आणि आरबीआयचे कौतुक

भारतीय अर्थव्यवस्थेने ज्या वेगाने पुनरागमन केले आहे ते अभूतपूर्व आहे. याचे श्रेय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि सरकारला जाते. नेहमी पुरेशी तरलता राहील याची आरबीआयने नेहमीच खात्री केली आहे. व्याजदर कमी केले आहेत. मला वाटते की आम्ही अर्थव्यवस्था खूप चांगल्या प्रकारे हाताळली आहे. बाजारपेठेतील विक्री चांगली आहे आणि पुढेही चांगली राहील, असा विश्वास केकी मिस्त्री यांनी व्यक्त केला.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी