खुशखबर : 'या' निर्णयामुळे पाम तेलाच्या किमतीत होणार घसरण

Palm Oil price: भारतात खाद्य तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. खाद्यतेलाच्या सोबतच पॅकेज्ड फूडमध्येही तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 

Palm Oil price in India: भारतीय बाजारात पामतेलाच्या किमतीत आणखी घसरण होऊ शकते. त्याचं कारण म्हणजे, इंडोनेशियाने निर्यात करात सूट देण्याची मुदत वाढवली आहे. त्यानंतर शक्यता व्यक्त केली जात आहे की, यामुळे पामतेल स्वस्त होऊ शकते. इम्पोर्ट टॅक्समध्ये सूट देण्याचा निर्णय 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी हा निर्णय 31 ऑगस्टपर्यंतच होता. 

इंडोनेशियाने घेतलेल्या या निर्णयामुळे पामतेलाचा पुरवठा वाढेल. मलेशियन पाम तेलाचे फ्युचर्स उच्चांकावरुन पाच टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. पाम तेलाच्या किमतीत घसरण ही एफएमसीजी कंपन्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी