PMC बॅक घोटाळा प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक

BJP neta's son arrested: पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार तारा सिंग यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. 

pmc bank scam rajneet singh former director son bjp leader tara sing mumbai police eow maharashtra news marathi
PMC बॅक घोटाळा प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक 
थोडं पण कामाचं
  • पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक
  • रजनीत सिंग यांना आर्थिक गुन्हे शाखेने केली अटक
  • रजनीत सिंग हे भाजपचे माजी आमदार तारा सिंग यांचे पुत्र 
  • रजनीत सिंग हे पीएमसी बँकेचे माजी संचालक

मुंबई: पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ९वी अटक झाली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने भाजपचे माजी आमदार तारा सिंग यांच्या मुलाला अटक केली आहे. आमदार तारा सिंग यांचे पुत्र रजनीत सिंग यांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. रजनीत सिंग हे पीएमसी बँकेचे माजी संचालक आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रजनीत सिंग हे पीएमसी बँकेचे माजी संचालक असून ते बँकेतील लोन कमिटीमध्ये म्हणजेच कर्ज वितरण करणाऱ्या कमिटीत सुद्धा होते. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ही ९वी अटक झाली आहे. रजनीत सिंग यांना मुंबईतील भांडूप परिसरातून अटक करण्यात आली आहे. 

या आठवड्याच्या सुरुवातीला, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणात बँकेच्या दोन लेखापरीक्षकांना अटक केली होती. हा घोटाळा झाला त्यावेळी जयेश सांघानी आणि केतन लकडावाला हे वैधानिक लेखापरीक्षक म्हणून काम करत होते. जयेश सांघानी आणि केतन लकडावाला या दोघांना बँकेतील गैरव्यवहाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.

पीएमसी बँकेने कोट्यावधी रुपयांच्या कर्जाचं वितरण केलं आणि या कर्ज वितरणात गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. या बँक घोटाळ्यात एचडीआयएल ग्रुप कंपन्यांचा संबंध असल्याचा संशय आहे. या बँकेत सर्वसामान्य नागरिकांचे पैसे अडकले असून या धक्क्याने आतापर्यंत बँकेच्या सहा ग्राहकांनी आपले प्राण गमावले आहेत. तसेच आपल्याला न्याय मिळावा यासाठी बँकेचे ग्राहक आंदोलनही करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी