[VIDEO]: PMC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, बँकेवर आरबीआयचे निर्बंध

काम-धंदा
Updated Sep 24, 2019 | 16:07 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

PMC Bank: पीएमसी म्हणजेच पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. बँकेच्या व्यवराहांवर आरबीआयने निर्बंध आणले आहेत. जाणून घ्या सविस्तर वृत्त...

pmc bank withdraw not more than rs 1000 rbi loan deposits payment mumbai
[VIDEO]: PMC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, बँकेचे व्यवहार ठप्प  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • पीएमसी बँकेतील सर्व व्यवहार ठप्प
  • पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे निर्बंध
  • ३५ अ अंतर्गत आरबीआयचे बँकेवर निर्बंध
  • पुढील सहा महिन्यांसाठी आरबीआयचे पीएमसी बँकेवर निर्बंध
  • बँकेबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
  • ग्राहकांना बँक खात्यातून केवळ १००० रुपये काढता येणार

मुंबई: पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) मधील सर्व व्यवहार अचानक ठप्प झाले आहेत. बँकेतील खातेधारकांना अवघे एक हजार रुपये इतकीच रक्कम बँक खात्यातून काढता येणार आहे. त्यासोबतच बँक नवीन कर्ज देणे, बँकेत डिपॉझिट करण्यावर आरबीआयने निर्बंध आणले आहेत. या संबंधी आरबीआयने आदेश काढला आहे. बँकेच्या ग्राहकांना एसएमएसद्वारे याची माहिती देण्यात आली आहे. बँकेचा एसएमएस येताच ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे आणि ग्राहकांनी बँकेत एकच गर्दी केली आहे. 

बँकेची स्थिती पाहून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने हा निर्णय घेतला आहे. आरबीआयने ३५ अ अंतर्गत पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे सर्व व्यवहार बंद केले असून त्या संबंधीचा आदेशही आरबीआयने काढला आहे. आरबीआयने काढलेल्या आदेशात म्हटलं आहे की, बँकेच्या ग्राहकांना १,००० रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाहीये, बँकेला कर्ज वितरण करता येणार नाही तसेच कर्जाचं नूतनीकरण सुद्धा करता येणार नाहीये.

आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार, भाडे, टॅक्स, वीज बिल, प्रिंटिंग आणि स्टेशनरी, पोस्टेज या सारख्या व्यवहारांसाठी बँकेला आपल्याकडील पैसे खर्च करता येणार आहेत असंही आरबीआयच्या आदेशात म्हटलं आहे.

ग्राहकांनी घाबरुन जावू नये

आरबीआयने २३ सप्टेंबर २०१९ रोजी हे निर्देश दिले आहेत. आरबीआयच्या या निर्देशात स्पष्ट म्हटलं आहे की, 'रिझर्व्ह बँकेने दिलेले निर्देश हे बँकिंग परवाना रद्द केला असल्याचं मानले जावू नये'.

यासोबतच पीएमसी बँकेच्या वेबसाईटवर गेल्यास तेथेही एक पॉपअप मेसेज येतो ज्यावर आरबीआयने काढलेल्या आदेशाचा उल्लेख करण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने लागू केलेले पीएमसी बँकेवर निर्बंध सहा महिन्यांसाठी असणार आहेत. तसेच आरबीआयकडून पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी