मुंबई : 2020 या वर्षाच्या शेवटच्या दिवशी (last trading day of year 2020) शेअर बाजारात (Share Market) काही विशेष बदल न होता बाजार बंद झाला. मात्र, शेअर बाजारात एक खास तेजी पहायला मिळाली. यंदाच्या वर्षी निफ्टी-50 (Nifty 50) ने 14,000ची पातळी ओलंडल्याचं पहायला मिळालं.
बीएसई सेन्सेक्स 5.11 अंक म्हणजेच 0.01 टक्क्यांच्या वाढीसह 47,751 च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 50 ने सत्रात 14 हजारांचा टप्पा गाठला मात्र, बाजाराच्या शेवटी 14000 च्यावर बंद झाला नाही. निफ्टी-50 इंडेक्सने 0.20 अंक म्हणजेच 0 टक्क्यांच्या किंचित वाढीसह 13,982वर बंद झाला.
बाजारातील तज्ञांच्या मते, निफ्टी-50 ने भलेही आज 14 हजारांच्या टप्प्यावर क्लोजिंग केली नसली तरी बाजारात तेजी पहायला मिळत आहे आणि त्यामुळे येत्या काळात निफ्टी 14,100 चा स्तर नक्कीच गाठेल.