[VIDEO]: Share Market: शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 769 अंकांची घसरण

Share Market: आज शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळालं. केंद्र सरकारद्वारे 10 बँकांचं विलीनीकरण करुन चार बँका तयार करण्याच्या वृत्ताचा शेअर बाजारात परिणाम दिसू लागला आहे. बँकांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

share market sexsex down
शेअर बाजारात घसरण  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • शेअर बाजारात मोठी घसरण
  • सेन्सेक्समध्ये 769 अंकांची घसरण
  • निफ्टीमध्ये सुद्धा घसरण झाल्याचं पहायला मिळालं

मुंबई: आर्थिक क्षेत्रात निर्माण झालेली स्थिती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार युद्धात झालेली वाढ या सर्वांचा परिणाम मंगळवारी शेअर बाजारावर दिसून आला. मंगळवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. या घसरणीमुळे मुंबईतील शेअर बाजारातील सेन्सेक्समध्ये 770 अंकांची घसरण झाली. तर निफ्टीतही घसरण झाली आणि निफ्टी 225 अंकांच्या नुकसानीवर बंद झाला.

मंगळवारी शेअर बाजारातील सेन्सेकमध्ये 867 अंकांची घसरण झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर दिवसाच्या शेवटी सेन्सेक्समध्ये आणखीन घसरण झाली आणि सेन्सेक्स 769.88 अंकांनी म्हणजेच 2.06 टक्क्यांच्या नुकसानासह 36,562.91 अंकांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील निफ्टीतही घसरण झाली. निफ्टीमध्ये 225.35 अंकांची घसरण म्हणजेच 2.04 टक्क्यांच्या नुकसानासह 10,797.90 अंकांवर पोहोचला. 

सेन्सेक्समधील कंपन्यांत आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, वेदांता, एचडीएफसी बँक, इंड्सइंड बँक, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ओएनजीसीचे शेअर्स 4.45 अंकांनी कोसळले. डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेल्या घसरणीमुळे टेकएम आणि एचसीएल टेक या दोन आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये किरकोळ वाढ झाल्याचं दिसून आलं.

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयात 90 पैशांनी घसरण झाली. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 72.27 रुपये प्रति डॉलर इतकी झाली आहे. केंद्र सरकारने नुकतंच सार्वजनिक क्षेत्रातील दहा बँकांचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे. यानंतर आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्येही घसरण झाल्याचं पहायला मिळालं.

बाजारातील तज्ञांच्या मते, सरकारने बँकांच्या विलीनीकरणाच्या घेतलेल्या निर्णयातून एक मेसेज जातो की, सरकार केवळ बँकांमध्ये नवं भांडवल ठेवत आहे तर त्यांचे कामकाज सुधारू इच्छित आहे. मात्र, तरिही बँकांचं हे विलीनीकरण बँकांची स्थिती पाहता त्रासदायक वाटत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी