CSMIA कडून ऑगस्‍ट 2023 मध्‍ये प्रवासी वाहतूक रिकव्‍हरीत 108 टक्‍के वाढ

ऑगस्‍ट 2023 मध्‍ये सीएसएमआयएने प्रवासी वाहतूकीमध्‍ये 4.32 दशलक्षची नोंद केली, ज्‍यामध्‍ये ऑगस्‍ट 2022 च्‍या (3.2 दशलक्ष) तुलनेत 32 टक्‍क्‍यांची वाढ झाली. सीएसएमआयए येथून प्रवास करणाऱ्या आंतरराष्‍ट्रीय प्रवाशांची संख्‍या गेल्‍या वर्षीच्‍या याच कालावधीमधील 0.84 दशलक्षच्‍या तुलनेत 33 टक्‍क्‍यांनी वाढून 1.1 दशलक्षपर्यंत पोहोचली. सीएसएमआयएने ऑगस्‍ट 2023 मध्‍ये एकूण 20,711 देशांतर्गत एटीएम आणि 6,960 आंतरराष्‍ट्रीय एटीएमची नोंद केली.

Updated Sep 18, 2023 | 07:33 PM IST

csmia reports 108 percent growth in passenger traffic recovery in august 2023

csmia reports 108 percent growth in passenger traffic recovery in august 2023

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट (CSMIA) ने ऑगस्‍ट 2023 मध्‍ये प्रवासी वाहतूकीसंदर्भात आपली उल्‍लेखनीय विकास गती कायम ठेवली आहे. सर्वोत्तम कनेक्‍टीव्‍हीटी आणि जागतिक दर्जाच्‍या पायाभूत सुविधेमुळे विमानतळाने ऑगस्‍ट'१९ च्‍या (महामारीपूर्व काळ) तुलनेत ऑगस्‍ट'23 मध्‍ये प्रवासी वाहतूकीमध्‍ये 108 टक्‍के रिकव्‍हरी केली. सीएसएमआयएने देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय प्रवाशांमध्‍ये वाढ करत सर्वोत्तम हवाई वाहतूक सेवा देण्‍यामधील नेतृत्‍व कायम राखले आहे, ज्‍यामधून भारतातील विमानसेवा क्षेत्रातील त्‍यांचे अग्रस्‍थान अधिक दृढ होते.
ऑगस्‍ट 2023 मध्‍ये सीएसएमआयएने प्रवासी वाहतूकीमध्‍ये 4.32 दशलक्षची नोंद केली, ज्‍यामध्‍ये ऑगस्‍ट 2022 च्‍या (3.2 दशलक्ष) तुलनेत 32 टक्‍क्‍यांची वाढ झाली. सीएसएमआयए येथून प्रवास करणाऱ्या आंतरराष्‍ट्रीय प्रवाशांची संख्‍या गेल्‍या वर्षीच्‍या याच कालावधीमधील 0.84 दशलक्षच्‍या तुलनेत 33 टक्‍क्‍यांनी वाढून 1.1 दशलक्षपर्यंत पोहोचली. सीएसएमआयएने ऑगस्‍ट 2023 मध्‍ये एकूण 20,711 देशांतर्गत एटीएम आणि 6,960 आंतरराष्‍ट्रीय एटीएमची नोंद केली, ज्‍यामधून विमानसेवा उद्योगाचा आधारस्‍तंभ म्‍हणून कंपनीचा दर्जा अधिक दृढ होतो.
ऑगस्‍ट 2023 मध्‍ये सीएसएमआयएसाठी दिल्‍ली, बेंगळुरू व चेन्‍नई टॉप देशांतर्गत गंतव्‍यं ठरली, तर दुबई, लंडन व अबु धाबी सर्वात पसंतीचे आंतरराष्‍ट्रीय गंतव्‍य राहिले. तसेच सीएसएमआयएने गेल्‍या वर्षीच्‍या याच कालावधीच्‍या तुलनेत आपल्‍या आंतरराष्‍ट्रीय क्षेत्रांमध्‍ये उल्‍लेखनीय वाढ केली.
ऑगस्‍ट महिन्‍यामध्‍ये काही अव्‍वल विकसित होणारी आंतरराष्‍ट्रीय क्षेत्रे होती म्‍युनिक (एमयूसी), जेथे प्रवासी वाहतूकीमध्‍ये 150 टक्‍क्‍यांची वाढ झाली, यानंतर उल्‍लेखनीय 138 टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह हनोईचा क्रमांक होता. इस्‍तांबुल (आयएसटी) येथे 110 टक्‍क्‍यांची मोठी वाढ दिसण्‍यात आली, तर नैरोबी (एनबीओ) व हो ची मिन्‍ह (एसजीएन) येथील प्रवासी वाहतुकीमध्‍ये ऑगस्‍ट 2022 च्‍या तुलनेत अनुक्रमे 99 टक्‍के व 96 टक्‍क्यांची वाढ झाली.
ऑगस्‍टमधील स्‍वातंत्र्य दिन आठवड्यादरम्‍यान प्रवासी संख्‍येमध्‍ये मोठी वाढ दिसण्‍यात आली. 11 व 12 ऑगस्‍ट रोजी सीएसएमआयएवर अनुक्रमे 1,50,257 व 1,50,907 प्रवाशांचे आगमन झाले, ज्‍यामध्‍ये ऑगस्‍ट 2023 मधील सरासरी दैनंदिन प्रवासी संख्‍येच्‍या (1,39,661) तुलनेत 8.4 टक्‍क्‍यांची वाढ दिसून आली.
देशांतर्गत क्षेत्रामध्‍ये इंडिगो 48 टक्‍के मार्केट शेअरसह अग्रस्‍थानी होती, ज्‍यानंतर 18 टक्‍क्‍यांसह एअर इंडिया आणि 17 टक्‍क्‍यांसह विस्‍ताराचा क्रमांक होता. आंतरराष्‍ट्रीय क्षेत्रामध्‍ये इंडिगोचा 22 टक्‍के मार्केट शेअर होता, ज्‍यानंतर 14 टक्‍क्‍यांसह एअर इंडिया आणि 10 टक्‍क्‍यांसह विस्‍ताराचा क्रमांक होता. ऑगस्‍टमध्‍ये इंडिगोने सीएसएमआयएवरून नैरोबी व जाकार्ताकरिता विमानसेवा सुरू केली, ज्‍यामधून प्रवाशांना अधिक पर्यटन गंतव्‍य व सोयीसुविधा मिळाल्‍या.
तसेच, सीएसएमआयएने 6 टक्‍क्‍यांची प्रभावी कार्गो टनेज वाढ केली, ऑगस्‍ट 2023 मध्‍ये देशांतर्गत कार्गो टनेजमध्‍ये 3 टक्‍क्‍यांची वाढ आणि आंतरराष्‍ट्रीय कार्गो टनेजमध्‍ये 8 टक्‍क्‍यांची वाढ केली.
नुकतेच सीएसएमआयए येथील प्रवासी वाहतुक आकडीवारीमधून विमानतळाचा उद्योगामधील स्थिर विकास दिसून येतो. तसेच ही सर्वोत्तम वाढ प्रवाशांचा सीएसएमआयएवरील विश्‍वास सार्थ ठरवते. यामधून विमानतळाची जगभरात विमानसेवा, जागतिक दर्जाचे आदरातिथ्‍य व सेवा प्रदान करण्‍यासह सुरक्षित प्रवासाची खात्री देण्‍याप्रती कटिबद्धता दिसून येते आणि सर्वांना सुलभ प्रवासाचा आनंद घेता येतो. सीएसएमआयए नव्‍या उंचीवर पोहोचत असताना अग्रस्‍थानी राहण्‍याप्रती, तसेच प्रवाशांच्‍या अपेक्षांची पूर्तता करण्‍याप्रती आणि जागतिक विमानसेवा उद्योगामध्‍ये सर्वोत्तमतेसाठी नवीन मानक स्‍थापित करण्‍याप्रती कटिबद्ध आहे.
ताज्या बातम्या
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited