iPhone फॉक्सकॉनचा भारतावर मोठा सट्टा, 300 कोटींच्या जमिनीवर होणार आयफोन बनवण्याचा प्लांट

Foxconn bought land in Bengaluru: आयफोन बनवणारी आघाडीची कंपनी फॉक्सकॉनने बेंगळुरूमध्ये 300 एकर जमीन 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहे. याद्वारे कंपनीला चीनमधून होणाऱ्या उत्पादन भारतात आणायचे आहे.

Updated May 10, 2023 | 04:01 PM IST

Foxconn plant in Bengaluru

Iphone: बंगळुरूमध्ये होणार आयफोन बनवण्याचा प्लांट, फॉक्सकॉनने 300 एकर जमीन विकत घेतली

फोटो साभार : PTI
थोडं पण कामाचं
  • भारतातून आयफोनचे उत्पादन वाढवण्यासाठी मोठी तयारी सुरू
  • बंगळुरूच्या 300 एकर जमिनीवर आयफोन बनवला जाणार
Foxconn bought land in Bengaluru: आयफोनची कंत्राटी उत्पादक कंपनी फॉक्सकॉनने बंगळुरू विमानतळाजवळ 300 एकर जमीन 300 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. फॉक्सकॉनने कर्नाटकची राजधानी बंगळुरूच्या विमानतळाजवळ देवनहल्ली येथे ही जमीन खरेदी केली आहे. बेंगळुरूमध्ये जमीन खरेदी करण्यामागील फॉक्सकॉनचे उद्दिष्ट चीनमधून उत्पादनात विविधता आणणे हा आहे.
लंडन स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत फॉक्सकॉनने बेंगळुरूमध्ये 300 एकर (1,214,058 चौरस मीटर) जमीन खरेदी केल्याचे सांगितले आहे. कंपनीने ही जमीन 1 कोटी रुपये प्रति एकर या दराने विकत घेतली आहे. म्हणजेच 300 एकर जमिनीसाठी 300 कोटी रुपये दिले आहेत.
फॉक्सकॉन होन हाय टेक्नॉलॉजी इंडिया मेगा डेव्हलपमेंट (Foxconn Hon Hai Technology India Mega Development) या फॉक्सकॉनच्या उपकंपनीने जमिनीसाठी 300 कोटी रुपये ($37 दशलक्ष) दिले आहेत.

5741 कोटी गुंतवणुकीची तयारी

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज एस. बोम्मई यांनी मार्चमध्ये सांगितले होते की, ॲपल लवकरच कर्नाटकातील एका नवीन प्लांटमध्ये आयफोन तयार करेल, ज्यामुळे सुमारे 100,000 रोजगार निर्माण होतील. ब्लूमबर्ग न्यूजद्वारे मार्च महिन्याच्या अहवालात असे सांगण्यात आले होते की फॉक्सकॉन कर्नाटकातील एका नवीन कारखान्यात $700 दशलक्ष (सुमारे 5741 कोटी रुपये) गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे.

आयफोन 2019 पासून भारतात तयार झाला

फॉक्सकॉन 2019 पासून दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यामधून आपल्या प्लांटद्वारे भारतात ॲपल हँडसेटचे उत्पादन करीत आहे. तसेच विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन हे दोन सप्लायर्स देखील भारतात ॲपलचे उपकरणे तयार करत आहेत.
ॲपल ने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सांगितले होते की ते आयफोन 14 मॉडेल लाँच केल्यानंतर काही आठवड्यांमध्ये भारतात त्यांच्या नव्या उपकरणांच्या उत्पादनाचे काम सुरू करतील. ब्लूमबर्गच्या हवाल्यानुसार, गेल्या वर्षी भारतात एकूण 7 आयफोनचे उत्पादन झाले आहे. या बाबतीत भारताच्या पुढे अमेरिका, चीन आणि जपान हे देश आहेत.

ॲपलदोन रिटेल स्टोअर उघडले

ॲपल भारतामध्ये आयफोनची मोठी बाजारपेठ उभी करण्याच्या बेतात आहे. गेल्या महिन्यात, कंपनीच्या सीईओने भारतातील पहिले दोन रिटेल स्टोअर उघडले, यामधील एक मुंबईत आहे तर दुसरे राजधानी दिल्लीमध्ये आहे.
ताज्या बातम्या

मुंबईत एनसीबीची 2 शतकातील सर्वात मोठी कारवाई, LSD ड्रग्जचे 15000 ब्लॉट्स जप्त

  2     LSD  15000

Bal Shivaji : 'मैं अटल हूं' च्या दिग्दर्शकाच्या नव्या सिनेमाची घोषणा, 'बाल शिवाजी' सिनेमात मुख्य भूमिकेत असणार हा कलाकार

Bal Shivaji

संजय राऊत हा बावळट, आमच्या मतांवर निवडून आलेला चोर; गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

शिवसेना वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? 2 कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद मिळणार

      2

Sankashti Chaturthi Date and Time : कधी आहे जून महिन्यातील संकष्ट चतुर्थी, काय करावे त्या दिवशी?

Sankashti Chaturthi Date and Time

Hair Oil: आता टक्कल लपवण्याची गरज नाही, हे तेल वापरा आणि केसगळतीपासून सुटका मिळवा

Hair Oil

Mumbai News : बर्थ डे बॉयला मिळाले भयानक गिफ्ट, मित्रांच्या कृत्यांनी मैत्रीला फासला काळीमा

Mumbai News

Hyundai Offers : पावसाळ्याआधी कार खरेदी करा आणि मिळवा मोठा डिस्काउंट

Hyundai Offers
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited