'या' 10 सरकारी योजना तुम्हाला मालामाल बनवण्यास करतात मदत, जबरदस्त रिटर्न्स सोबतच टॅक्स सेव्हिंगचाही मिळतो लाभ

अनेक सरकारी योजना आहेत ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. या सरकारी योजनेत मासिक, सहामाही, वार्षिक गुंतवणूक करुन एक मोठा निधी जमा केला जाऊ शकतो. जाणून घ्या कोणत्या या योजना आहेत...

Updated May 20, 2023 | 10:54 PM IST

'या' 10 सरकारी योजना तुम्हाला मालामाल बनवण्यास करतात मदत, जबरदस्त रिटर्न्स सोबतच टॅक्स सेव्हिंगचाही मिळतो लाभ
Government Schemes for Investment : गुंतवणुकीचे अनेक पर्याय (Investment options) बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, सुरक्षित योजनांमध्ये आपला पैसा गुंतवण्याला नागरिक प्राधान्य देतात. अनेक सरकारी योजना आहेत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा सुद्धा मिळतो. तसेच टॅक्स सेव्हिंगसाठी सुद्धा याचा फायदा होतो. केंद्र सरकारच्या 10 सर्वात लोकप्रिय आणि फायदेशीर योजनांबाबत आज आपण जाणून घेऊयात..
थोडी-थोडी गुंतवणूक करुन एक मोठी रक्कम उभी करता येते. ही रक्कम गरजेच्या काळात फार महत्त्वाची ठरते. तसेच तुम्हाला लखपती आणि कोट्याधीश बनण्यासही हातभार लावू शकते. मुलींना, वृद्धांना, महिलांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्याचं केंद्र सरकारचं लक्ष आहे. त्यासाठीच गुंतवणुकीच्या अनेक सरकारी योजना चालवण्यात येतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना सुरू आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही महिला आणि मुलींसाठी सुरू आहे. जाणून घ्या कोणत्या सरकारी योजना आहेत ज्या तुम्हाला चांगला परतावा मिळवून देऊ शकतात.

नॅशनल सेव्हिंग मंथली इन्कम स्कीम

या योजनेत गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला मोठी रक्कम एकत्र मिळू शकते. या सरकारी योजनेत 1000 रुपयांपासून कमाल 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. ही गुंतवणूक योजना 5 वर्षांत मॅच्युअर होते आणि गुंतवणुकदाराला 7.4 टक्के दराने त्यात व्याज मिळतो.

सीनिअर सिटीझन सेव्हिंग स्कीम

केंद्र सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी जेष्ठ नागरिक बचत योजना चालवण्यात येते. या योजनेत 5 वर्षांच्या काळासाठी 30 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. सेवानिवृत्त व्यक्ती किंवा 55 वर्षांवरील वृद्ध व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या बचत योजनेवर सरकार सर्वाधिक म्हणजेच 8.2 टक्के व्याज देते.

या 10 सरकारी योजना गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम

  1. नॅशनल सेव्हिंग मंथली इन्कम स्कीम - व्याज दर 7.4 टक्के
  2. नॅशनल सेव्हिंग टाईम डिपॉझिट स्कीम - व्याज दर 7.5 टक्के
  3. सीनिअर सिटीझन सेव्हिंग स्कीम - व्याज दर 8.2 टक्के
  4. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट - व्याज दर 7.7 टक्के
  5. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीम - 7.1 टक्के व्याज दर
  6. सुकन्या समृद्धी खाते - 8 टक्के व्याज दर
  7. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र - व्याज दर 7.5 टक्के
  8. किसान विकास पत्र - व्याज दर 7.5 टक्के
  9. रिकरिंग डिपॉझिट सेव्हिंग स्कीम - व्याज दर 6.2 टक्के
  10. पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम - व्याज दर 4 टक्के
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited