Cooking Oil : केंद्र सरकारचा मोठा निर्णय, खाद्यतेल स्वस्त होणार

Cooking Oil Price Cut : केंद्र सरकारने खाद्यतेल निर्मात्यांना त्यांच्या उत्पादनांच्या कमाल किरकोळ किमतीत (Maximum Retail Price / MRP) कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारी निर्देशांचे पालन करत खाद्यतेल कंपन्यांनी स्वयंपाकाच्या तेलाच्या किमती सहा टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. खाद्यतेलाचा प्रमुख आयातदार असलेल्या भारताने 2021-22 दरम्यान 1.57 लाख कोटी रुपयांच्या खाद्यतेलाची आयात केली आहे.

Updated May 5, 2023 | 05:31 PM IST

cooking oil

cooking oil

Cooking Oil Price Cut : केंद्र सरकारने खाद्यतेल निर्मात्यांना त्यांच्या उत्पादनांच्या कमाल किरकोळ किमतीत (Maximum Retail Price / MRP) कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारी निर्देशांचे पालन करत खाद्यतेल कंपन्यांनी स्वयंपाकाच्या तेलाच्या किमती सहा टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
खाद्यतेलाचा प्रमुख आयातदार असलेल्या भारताने 2021-22 दरम्यान 1.57 लाख कोटी रुपयांच्या खाद्यतेलाची आयात केली आहे. मलेशिया आणि इंडोनेशिया येथून पामतेल तर अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून सोयाबीन तेलाची आयात करण्यात आली आहे.
आता केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करत फॉर्च्युन, धारा आणि जेमिनी या मोठ्या ब्रँडच्या खाद्यतेलांच्या किमती कमी करण्याची तयारी निर्मात्या कंपन्यांनी दाखवली आहे. बाजाराच्या अभ्यासकांच्या मते किमती पुढील काही दिवसांत प्रति लिटर 20 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. ही शक्यता प्रत्यक्षात आली तर खाद्यतेल स्वस्त होणार आहे. सामान्यांना दिलासा मिळणार आहे.
गौतम अदानी समूहाची कंपनी अदानी विल्मरने तेलाच्या दरात प्रति लिटर पाच रुपयांनी कपात केली आहे. अदानी विल्मर फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत खाद्यतेल विकते. कंपनी सोया, अंबाडी, मोहरी, तांदळाचा कोंडा, शेंगदाणे आणि कापूस बियाणे तेल विकते. तर, जेमिनी एडिबल आणि फॅट्स इंडियाने प्रति लिटर दहा रुपयांनी किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मदर डेअरी धारा ब्रँड अंतर्गत खाद्यतेलाच्या किमतीत पंधरा ते वीस रुपये कमी करण्याच्या तयारीत आहे. मदर डेअरीने गेल्या वर्षी जुलैमध्ये भाव कमी केले होते.
भारतात खाद्यतेलासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलबिया मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून देशात खाद्यतेल स्वस्त होणार आहे. दरकपातीचा फायदा नागरिकांना होणार आहे, असा विश्वास बाजाराच्या अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited