New Business Ideas: लोखंड विकून ही महिला कमावते दरमहा अडीच लाख, तुम्हीही घेऊ शकता सरकारच्या या योजनेचा लाभ

New Business Ideas with law investment: सरकारच्या स्टँड-अप इंडिया अंतर्गत सुमिता सरकार या महिलेने लाखो रुपयांचे कर्ज घेतले, आणि आपल्या व्यवसायाला यशस्वी सुरुवात केली. आज ही महिला दरमहा अडीज लाख रुपये कमावते आहे. तुम्ही देखील सरकारच्या या योजनेचा फायदा घेऊ शकतात, जाणून घेऊ या योजनेबद्दल आणि त्याच्या प्रक्रियेबद्दलची माहिती.

Updated May 7, 2023 | 02:49 PM IST

New Business Ideas with law investment

कमी गुंतवणुकीतून व्यवसायात मोठा फायदा, जाणून घ्या सरकारच्या या नव्या कर्ज योजनेबद्दल

थोडं पण कामाचं
  • सुमिता सरकार यांना 24.5 लाखांचे कर्ज मिळाले
  • आज त्या वार्षिक 33.77 लाखांची कमाई करतात
New Business Ideas with law investment: सामान्य माणसाला व्यवसाय उभा करण्यासाठी सरकारकडून अनेक प्रकारच्या कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. यापैकी एक म्हणजे स्टँड-अप इंडिया. स्टँड-अप इंडिया अंतर्गत 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
एका महिलेने स्टँड-अप इंडिया या योजनेअंतर्गत कर्ज घेतले होते, आज ती महिला वार्षिक 33 लाख रुपयांहून अधिक कमावत आहे. सुमिता सरकार नामक या महिलेची ही कामगिरी आपण पुढे जाणून घेणार आहोत. तुम्ही देखील या योजनेअंतर्गत कर्ज घेऊ शकता, पण ते कसे हे जाणून घ्या.
सुमिता सरकार ही पश्चिम बंगालमधील संत्रागाछी जिल्ह्यातील एक महिला उद्योजक आहे. त्यांनी बँकेकडून ऑफलाइन पद्धतीने 24.50 लाखांचे कर्ज घेतले होते. त्यांना हे पैसे स्टँड-अप इंडिया योजनेअंतर्गत बँक ऑफ इंडियाकडून कर्जाच्या रूपात मिळाले होते. आज त्या M/S S.S. Enterprises मधून लाखो कमवत आहेत.

सुमिता सरकार यांची कंपनी करते 33 लाखांहून अधिक वार्षिक उलाढालउद्यमीमित्र च्या मते, सुमिता सरकार यांच्याच्या M/S S. S. Enterprises कंपनीची वार्षिक उलाढाल 33.77 लाख इतकी आहे. म्हणजेच दरमहा अडीच लाख रुपयांहून अधिक त्या कमावतात. त्यांची कंपनी लोखंड आणि बिगर लोखंड (Ferrous and Non-Ferrous Items) वस्तूंचा व्यापार करते.
सुमिता यांनी कर्जासाठी अर्ज केल्यावर, बँकेने त्यांच्या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांना स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत कर्ज देण्यात आले.

प्राथमिक अडचण

सुरुवातीच्या काळात सुमिता यांना आपल्या उत्पादनांच्या मार्केटिंगमध्ये काही अडचणी आल्या होत्या. मात्र स्थानिक व्यावसायिकाच्या मदतीने त्यांनी त्यावर मात केली. त्यांनी त्यांच्या युनिटमधील एका व्यक्तीला थेट नोकरी देखील दिली आहे. आता त्याचे व्यवसाय आर्थिकदृष्ट्या चांगला विकसित होत आहे.

स्टँड-अप इंडिया अंतर्गत कर्ज मिळवण्याची प्रकियास्टँड-अप इंडिया अंतर्गत कर्ज घ्यायचे असेल तर सर्वप्रथम या लिंकवर जा. येथे तुम्हाला नाव आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि जनरेट OTP वर क्लिक करावे लागेल.
ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला एका नवीन पृष्ठावर जोडले जाईल. तिथे तुम्हाला तुमचे सर्व माहिती भरावी लागेल. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल.

स्टँड-अप इंडियाची ही मार्गदर्शक तत्त्वे आहेत, (यावर क्लिक करा)

कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही या लिंकवर योजनेची सर्व मार्गदर्शक तत्त्वे वाचू शकता.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited