ट्रेंडिंग:

June 2023 : जूनमध्‍ये नियम बदलणार, नियम बदलाचा सामान्यांच्या जीवनावर होणार परिणाम

Deadlines in June : जून महिन्याची सुरुवात गुरुवार 1 जून 2023 रोजी होणार आहे. नव्या महिन्याची सुरुवात होण्याला आता एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे.या जून महिन्यात देशभर काही नवे नियम लागू होणार आहेत. काही महत्त्वाच्या प्रक्रिया करण्याची मुदत संपणार आहे. यामुळे सामान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम होणार आहे. यासाठी जाणून घेऊ जून 2023 मध्ये होणार असलेले मोठे आणि महत्त्वाचे बदल.

Updated May 27, 2023 | 12:40 PM IST

June, June 2023

June, June 2023

Deadlines in June : नव्या महिन्याची सुरुवात होण्याला आता एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. जून महिन्याची सुरुवात गुरुवारी 1 जून 2023 रोजी होणार आहे. नव्या महिन्यात अर्थात जून महिन्यात देशभर काही नवे नियम लागू होणार आहेत. काही महत्त्वाच्या प्रक्रिया करण्याची मुदत संपणार आहे. यामुळे सामान्यांच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे.
  1. पॅन-आधार लिंकिंग : पॅन आणि आधार हे दोन्ही नंबर एकमेकांशी लिंक करण्यासाठी 30 जून 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही प्रक्रिया मुदत संपेपर्यंत पूर्ण केली नाही तर नंतर लिकिंग करण्यासाठी मोठा दंड आकारला जाणार आहे. आयकर अधिनियम 1961 मध्ये या संदर्भात तरतूद आहे.
  2. EPS पेंशन : कर्मचारी भविष्य निधी संघटनेने अर्थात ईपीएफओने (Employees Provident Fund Organasation/EPFO) ईपीएस (Employees Pension Scheme/EPS) अंतर्गत उच्च पेंशन घेऊ इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना अर्ज करण्यासाठी दिलेली मुदत सोमवार 26 जून 2023 रोजी संपणार आहे. फॉर्म भरण्याआधी संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांची सर्व जुनी कर्मचारी भविष्य निधीची खाती एकाच युनिव्हर्सल अकाउंट नंबरशी (UAN) संलग्न करण्याचे बंधन आहे.
  3. आधार अपडेट : आधार नंबर अंतर्गत नोंदवलेल्या वैयक्तिक माहितीत जर काही बदल करायचा असेल तर तो बदल 14 जून 2023 पर्यंत विनामूल्य करून घेता येईल. यानंतर myAadhaar पोर्टलवरून किंवा प्रत्यक्ष आधार सेंटरवर जाऊन 50 रुपये शुल्क मोजून आधार अपडेट करता येईल.
  4. बँक लॉकर अॅग्रीमेंट : बँकांनी ग्राहकांसोबत लॉकर बाबत नवे करार 30 जून 2023 पर्यंत करावे अशी सूचना रिझर्व्ह बँकेने दिली आहे. सर्वांशी नवे करार करणे जमले नाही तरी बँकांनी 30 जून 2023 पर्यंत 50 टक्के ग्राहकांशी तरी सुधारित करार करावे, अशी सूचना रिझर्व्ह बँकेने दिली आहे.
  5. इंडियन बँकेची स्पेशल एफडी :इंडियन बँकेने इंड सुपर 400 डेज या स्पेशल फिक्स डिपॉझिटची मुदत 30 जून 2023 पर्यंत वाढवली आहे. या एफडीवर सामान्यांना 7.25 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के आणि 80 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना 8 टक्के दराने व्याज मिळेल.
  6. स्टेट बँकेची एफडी : भारतीय स्टेट बँकेने ज्येष्ठांचा विचार करून अमृत कलश नावाची 400 दिवसांची एफडी योजना सुरू केली आहे. या योजनेत 30 जून 2023 पर्यंत गुंतवणूक केल्यास सामान्यांना 7.10 टक्के, ज्येष्ठांना 7.60 टक्के दराने ठेवीवर व्याज मिळेल.
ताज्या बातम्या

वडिलांप्रमाणेच ओमराजे निंबाळकर यांच्या हत्येचा प्रयत्न? अंगावर डंपर येत असल्याचं पाहून रोडखाली उडी मारल्याने बचावले

Ashadhi Ekadashi 2023: आषाढी वारीला सुरुवात, जाणून घ्या वारी म्हणजे काय आणि वारीचे महत्त्व

Ashadhi Ekadashi 2023

Daily Horoscope 10 June: आजचे राशीभविष्य; वाचा हा शनिवार तुमच्यासाठी कसा असणार

Daily Horoscope 10 June

Vastu Tips: तुमच्या घरातील तुळस वारंवार सुकते? मग व्हा सावध अन् तात्काळ करा 'हे' उपाय

Vastu Tips

Sharad Pawar : जीवे मारण्याच्या धमकीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'धमक्या देऊन....'

Sharad Pawar

Ashadhi Wari 2023 Timetable: आषाढी वारी कधी? जाणून घ्या तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालखीचे संपूर्ण वेळापत्रक

Ashadhi Wari 2023 Timetable

Sharad Pawar News Today : शरद पवारांना धमकी देणारा तरुण भाजपचा कार्यकर्ता? जाणून घ्या सौरभ पिंपळकर आहे तरी कोण?

Sharad Pawar News Today

Sharad Pawar Death Threat: मोठी बातमी! तुमचा लवकरच दाभोलकर होणार, शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

Sharad Pawar Death Threat
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited