अदानी-हिंडेनबर्ग वाद : सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ज्ञ समितीचा अहवाल सार्वजनिक - पहा 11 ठळक मुद्दे

अदानी समूहाविरुद्धच्या हिंडेनबर्ग आरोपांबाबत सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या तज्ञांच्या समितीचा अंतरिम अहवाल सार्वजनिक करण्यात आला आहे. त्यातील महत्त्वाचे मुद्दे

Updated May 19, 2023 | 04:14 PM IST

Gautam Adani

Supreme Court appointed experts panel’s interim report public on Hindenburg allegations against Adani Group

फोटो साभार : ET Now Digital
मुंबई : अदानी समूहाविरुद्धच्या हिंडेनबर्ग आरोपांबाबत सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या तज्ञांच्या समितीचा अंतरिम अहवाल सार्वजनिक करण्यात आला आहे. त्यातील महत्त्वाचे मुद्दे
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालातील ठळक निरिक्षण -
१. अदाणी समुहाने लाभकारक अशा सर्व भागीदारांबाबतची माहिती जाहीर केलेली आहे.
२. अदाणी समूह लाभार्थ्यांची नावे जाहीर करत नसल्याचा ठपका सेबीने ठेवलेला नाही.
३. हिडनबर्गच्या अहवालानंतर उलट अदाणीतील छोट्या गुंतवणूकदारांचा हिस्सा वाढला आहे.
४. हिडनबर्ग अहवालानंतर काही कंपन्यांनी अल्पावधीत समभाग विक्रीतून अल्पावधीत कमावलेल्या नफ्याची चैकशी होणे गरजेचे आहे.
५. अस्तित्वातील प्रमुख नियमांचे वा कायद्यांचे कोणतेही उल्लंघन केल्याचे आढळलेले नाही.
६. सेबीच्या विद्यमान चैकशीमुळे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले.
७. मालमत्ता व्यवस्थापनांतर्गत विविध १३ परकीय संस्था तसेच ३२ भागधारकांबाबतची पुरेशी माहिती सेबीकडे अद्याप नसल्याचे स्पष्ट होते.
८. अशा १३ संस्थांबाबतची थकित चैकशी पुढे करावयाची किंवा नाही हे सेबीवर सोपविण्यात आले आहे.
९. संबंधित प्रकरण सक्तवसुली संचलनालयाकडे सोपविण्याबाबत सेबीने कोणतेही मुख्य आरोप केले नसल्याचे आढळून आले आहे.
१०. भांडवली बाजारात अस्वस्थता निर्माण न होऊ देता उलटपक्षी अदाणी कंपन्यांचे शेअर नव्या मूल्यावर स्थिरावले आहेत.
११. गुंतवणूकदाराना दिलासा देण्यासाठी अदाणी समुहाने केलेल्या उपाययोजनांची अहवालात प्रशंसा करण्यात आली आहे.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited