Gold Silver Rate Today : मुंबईत हा आहे आजचा सोन्याचा आणि चांदीचा दर

Gold Silver Price Today : ज्योतिषशास्त्रानुसार आज (गुरुवार 25 मे 2023) गुरुपुष्यामृत योग आहे. या दिवशी सोन्याची खरेदी शुभ समजली जाते. याच कारणामुळे आज दिवसभरातील सोन्याच्या आणि चांदीच्या व्यवहारांमध्ये वाढ होईल असा अंदाज सोन्याचांदीच्या व्यापारातील अनुभवी व्यावसायिक व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर जाणून घ्या आजचे सोन्याचे आणि चांदीचे बाजारातील ताजे दर.

Updated May 25, 2023 | 02:39 PM IST

Gold Silver

Gold Silver

Gold Silver Price : ज्योतिषशास्त्रानुसार आज (गुरुवार 25 मे 2023) गुरुपुष्यामृत योग आहे. या दिवशी सोन्याची खरेदी शुभ समजली जाते. याच कारणामुळे आज दिवसभरातील सोन्याच्या आणि चांदीच्या व्यवहारांमध्ये वाढ होईल असा अंदाज सोन्याचांदीच्या व्यापारातील अनुभवी व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
मुंबईत आज 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट (शुद्ध सोने) सोन्याचा दर 61 हजार 965 रुपये एवढा आहे. तसेच मुंबईत आज 10 ग्रॅम चांदीचा दर 730 रुपये 50 पैसे आणि 1 किलो चांदीचा दर 73 हजार 50 रुपये एवढा आहे.
सोन्याचांदीच्या दरात चढउतार सुरू आहे. याआधी काल म्हणजेच बुधवार 24 मे 2023 रोजी मुंबईत 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट (शुद्ध सोने) सोन्याचा दर 62 हजार 535 रुपये एवढा होता. तर 10 ग्रॅम चांदीचा दर 740 रुपये 50 पैसे आणि 1 किलो चांदीचा दर 74 हजार 50 रुपये होता. कालच्या तुलनेत आज सोन्याचांदीच्या दरात घट झाल्याचे चित्र आहे.
बाजार सुरू झाल्यावर पहिल्या सत्रात सोन्याच्या आणि चांदीच्या मागणीत अपेक्षित वाढ दिसलेली नाही. पण दिवस संपण्याआधी मागणीत वाढ होईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
goodreturns च्या आकडेवारीनुसार भारतात आज (गुरुवार 25 मे 2023) 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा दर 55 हजार 800 रुपये आहे. याआधी काल (बुधवार 24 मे 2023) 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा दर 56 हजार 250 रुपये होता.
goodreturns च्या आकडेवारीनुसार भारतात आज (गुरुवार 25 मे 2023) 10 ग्रॅम चांदीचा दर 730 रुपये 50 पैसे आणि 1 किलो चांदीचा दर 73 हजार 50 रुपये एवढा आहे. याआधी काल (बुधवार 24 मे 2023) 10 ग्रॅम चांदीचा दर 740 रुपये 50 पैसे आणि 1 किलो चांदीचा दर 74 हजार 50 रुपये होता.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited