LIVE अकोला लोकसभा निवडणूक २०१९  :  संजय धोत्रे विजयी

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 23, 2019 | 22:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

अकोला लोकसभा मतदार संघात भाजपने दोन टर्म जिंकून आलेल्या संजय धोत्रे यांनाच उमेदवारी कायम केली आहे. तर काँग्रेसकडून हिदायत पटेल आणि वंचितकडून प्रकाश आंबेडकर रिंगणात आहे. 

akola loksabha election results 2019
अकोला लोकसभा निवडणूक निकाल २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

अकोला :  अकोला लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत पाहायला मिळाली.  विजयाची हॅट्ट्रिकच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या भाजपच्या संजय धोत्रे यांना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या हिदायत पटेल यांचे आव्हान आहे. प्रकाश आंबेडकर यांनी देखील या मतदार संघातून तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी कंबर कसली आहे. 

 

LIVE UPDATES

 1. संजय धोत्रे विजयी 

 2. संजय धोत्रे 268462 मतांनी आघाडीवर

 3. संजय धोत्रे 263721 मतांनी आघाडीवर

 4. संजय धोत्रे 239493 मतांनी आघाडीवर

 5. संजय धोत्रे 226022 मतांनी आघाडीवर

 6. संजय धोत्रे 211799 मतांनी आघाडीवर 

 7. संजय धोत्रे 186994 मतांनी आघाडीवर

 8. संजय धोत्रे 118691 मतांनी आघाडीवर

 9. संजय धोत्रे 101526 मतांनी आघाडीवर

 10. संजय धोत्रे ४१ हजार मतांनी आघाडीवर

 11. अकोला संजय धोत्रे, भाजप ३५८४४ मतांनी आघाडीवर

 12. संजय धोत्रे (भाजपा) - ८०६००

  प्रकाश आंबेडकर (वंचित) - ५२१८२

  हिदायत पटेल (काँग्रेस)- ३२९९९

  नोटा - १३५७

  एकूण - १ लाख ७१ हजार ९९८

  धोत्रे (मताधिक्य) - २८४१८

 13. सुरूवातीच्या फेरीत प्रकाश आंबेडकर आघाडीवर
 14. ईव्हीएम मतमोजणीला सुरूवात
 15. टपाल मतमोजणीत भाजप आघाडीवर 
 16. टपाल मतमोजणीला सुरूवात
 17. थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात
 18.  

 

टाइम्स नाऊ मराठीचा ग्राऊंड 'सेंटी'मीटर रिपोर्ट

अकोला लोकसभा मतदार संघातील मतदानाचा पॅटर्न पाहिला तर यात भाजपच्या संजय धोत्रे यांना फायदा होताना दिसत आहे. या मतदार संघात मोदी सरकारच्या कामगिरीचा मुद्दा आणि जातीचा मुद्दा चालला नाही. तर या ठिकाणी प्रकर्षाने चालला तो धर्माचा मुद्दा... प्रकाश आंबेडकर हे बौद्ध आहेत, काँग्रेसचे हिदायत पटेल मुस्लिम आणि संजय धोत्रे हे हिंदू आहेत. त्यामुळे या तिघांमध्ये या मतदार संघातील मते विभागली गेली आहेत. या ठिकाणी हिंदूंची संख्या जास्त असल्यामुळे त्याचा फायदा संजय धोत्रे यांना जास्त होताना दिसत आहे. 

गेल्या निवडणुकीचा विचार करता मोदी फॅक्टर संजय धोत्रे यांच्या मदतीला आले. त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या हिदायत पटेल यांच्यावर सुमारे २ लाख ३ हजार मतांनी विजय मिळविला. धोत्रे यांना ४ लाख ५६ हजार मते पडली होती तर हिदायत पटेल यांना २ लाख ५३ हजार मते पडली होती.  तर तिसऱ्या क्रमांकाची मते ही प्रकाश आंबेडकरांना पडली होती. ती सुमारे २ लाख ३८ हजारांच्या आसपास होती.  संजय धोत्रे यांना एकूण मतदानाच्या ४६.६४ टक्के मते पडली होती. तर हिदायत पटेल यांना २५.८९ आणि आंबेडकरांना २४.४० टक्के मते पडली होती.  या दोघांची बेरीज केली तर ती धोत्रेंना महागात पडली असती, पण तसेच झाले नाही.  यंदाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  त्यामुळे हिंदू मतांची संख्या अधिक असल्यामुळे धोत्रे यांचे पारडे जड आहे. 

धोत्रे बाबत बोलायचे झाले तर मोदी सरकार विरोधातील शेतकऱ्यांचा असंतोष आणि जात हे दोन मुद्दे त्यांच्या विरोधात जाऊ शकतात. त्यामुळे त्यांचे दोन लाखांचे लीड कमी होईल आणि अत्यंत कमी मताधिक्याने ते निवडून येऊ शकतात. 

( टाइम्स नाऊ मराठीने वरील लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. त्यानुसार हा अंदाज वर्तविण्याचा प्रयत्न आहे. ) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी