अमरावती लोकसभा निवडणूक २०१९  :   अडसूळांना यंदा मिळाली टफ फाईट

लोकसभा निवडणूक २०१९
amravati loksabha election results 2019
प्रशांत जाधव | संपादक, टाइम्स नाऊ मराठी
Updated May 22, 2019 | 17:06 IST

अमरावती लोकसभा मतदार संघात शिवसेनेने विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांना पाचव्यांदा उमेदवारी दिली आहे.  त्यांच्या विरूद्ध युवा स्वभिमान पक्षाच्या नवनीत राणा उभ्या आहेत. 

amravati loksabha election results 2019
अमरावती लोकसभा निवडणूक निकाल २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

अमरावती :  शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ पाचव्यांदा विजय मिळविण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांनी आतापर्यंत १९९९ पासून चार निवडणुकांध्ये विजय मिळविला आहे.  गेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभ्या असलेल्या नवनीत राणा यांना १ लाख ३७ हजार मतांनी पराभूत केले होते. गेल्या वेळी मोदी लाट होती, तसेच अडसूळांचे मतदार संघातील दबदबा कामी आला होता. पण यंदाची परिस्थिती वेगळी आहे. 

टाइम्स नाऊ मराठीचा ग्राऊंड 'सेंटी'मीटर रिपोर्ट

अमरावती लोकसभा मतदार संघातून यापूर्वीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या नवनीत कौर राणा यंदा त्यांचे पती रवी राणा यांचा पक्ष युवा स्वाभिमानी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या खात्यातील ही जागा रवी राणांच्या पक्षाला दिली आहे. आपल्या जवळच्या उमेदवार नसल्याचा तोटा त्यांना निवडणुकीत झाला. पण ग्रामीण भागातील रिपोर्ट पाहता त्यांना चांगले मतदान झाले आहे. तसेच शेतकरी मोदी सरकारवर नाराज असल्याने तसेच अडसूळांविरुद्धची अँटी एन्कबन्सी ही त्यांना बाधक ठरू शकते. पण गेल्या चार निवडणुकांत अमरावतीकरांनी अडसूळांना निर्विवाद निवडून दिले आहेत. पण यंदा नवनीत कौर राणा आणि त्यांच्या पतींनी चांगली फिल्डिंग मतदार संघात लावल्याने ही निवडणूक आनंदरावांना अडसूळांना दुःखी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

२००९ च्या मतदानावर नजर टाकली असताना आनंदराव अडसूळ यांनी  गवई गटाच्या राजेंद्र गवई यांना केवळ ६७ हजार मतांनी पराभूत केले होते. पण यंदा अडसूळांचा लीड कमी होऊ शकतो. तसेच अमरावतीत वंचित बहूजन आघाडीचा फॅक्टर न चालल्याने ती मते नवनीत कौर राणा यांच्या पारड्यात जाऊ शकतात.  त्यामुळे अडसूळांना अडचणीचे ठरू शकते. 

(टाइम्स नाऊ मराठीने वरील लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. त्यानुसार हा अंदाज वर्तविण्याचा प्रयत्न आहे. ) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
अमरावती लोकसभा निवडणूक २०१९  :   अडसूळांना यंदा मिळाली टफ फाईट Description: अमरावती लोकसभा मतदार संघात शिवसेनेने विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांना पाचव्यांदा उमेदवारी दिली आहे.  त्यांच्या विरूद्ध युवा स्वभिमान पक्षाच्या नवनीत राणा उभ्या आहेत. 
Loading...
Loading...
Loading...