LIVE अमरावती लोकसभा निवडणूक २०१९  : युवा स्वाभीमानी पक्षाच्या नवनीत राणा विजयी

अमरावती लोकसभा मतदार संघात शिवसेनेने विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांना पाचव्यांदा उमेदवारी दिली आहे.  त्यांच्या विरूद्ध युवा स्वभिमान पक्षाच्या नवनीत राणा उभ्या आहेत. 

amravati loksabha election results 2019
अमरावती लोकसभा निवडणूक निकाल २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

अमरावती :  शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ पाचव्यांदा विजय मिळविण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांनी आतापर्यंत १९९९ पासून चार निवडणुकांध्ये विजय मिळविला आहे.  गेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभ्या असलेल्या नवनीत राणा यांना १ लाख ३७ हजार मतांनी पराभूत केले होते. गेल्या वेळी मोदी लाट होती, तसेच अडसूळांचे मतदार संघातील दबदबा कामी आला होता. पण यंदाची परिस्थिती वेगळी आहे. 

LIVE UPDATES

 1. युवा स्वाभीमानी पक्षाच्या नवनीत राणा विजयी 

 2. नवनीत राणा 37162 मतांनी आघाडीवर

 3. नवनीत राणा 38196 मतांनी आघाडीवर

 4. आनंदराव अडसूळ शिवसेना 10032 मतांनी आघाडीवर 

 5. अमरावती आनंदराव अडसूळ शिवसेना 9125 मतांनी आघाडीवर

 6. अमरावती आनंदराव अडसूळ शिवसेना २९४३मतांनी आघाडीवर

 7. दुसरी फेरी अमरावती लोकसभा

  आनंदराव अडसूळ ( 59389), नवनीत राणा (53319),गुणवंत देवपारे (8243), अरुण वानखडे (1579 ), संजय आठवले (212), विनोद गाडे (148), नरेंद्र कठाणे (204), निलीमा भटकर (160), निलेश पाटील (169), पंचशिला मोहोड (224), अनिल जामनेकर (139), अंबादास वानखडे (598), पंकज मेश्राम (325), प्रमोद मेश्राम (157), प्रवीण सरोदे (251), मिनाक्षी करवाडे (1032), राजू जामनेकर (478), राजू  सोनोने (134), राजू मानकर (76), राहूल मोहोड (94), विजय विल्हेकर (1189), विलास थोरात (136), श्रीकांत रायबोले (152), ज्ञानेश्वर मानकर (100)

  वैध मते 128508, नोटा 819, एकूण 129327

 8. आनंदराव अडसूळ (सेना) 91487
  नवनीत राणा (महाआघाडी) 88422
  गुणवंत देवपारे (वंचित) 11520
  अरुण वानखड़े बसपा 2271

  मताधिक्य अडसूळ 3065

 9. टपाल मतमोजणीला सुरूवात
 10. थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

टाइम्स नाऊ मराठीचा ग्राऊंड 'सेंटी'मीटर रिपोर्ट

अमरावती लोकसभा मतदार संघातून यापूर्वीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या नवनीत कौर राणा यंदा त्यांचे पती रवी राणा यांचा पक्ष युवा स्वाभिमानी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या खात्यातील ही जागा रवी राणांच्या पक्षाला दिली आहे. आपल्या जवळच्या उमेदवार नसल्याचा तोटा त्यांना निवडणुकीत झाला. पण ग्रामीण भागातील रिपोर्ट पाहता त्यांना चांगले मतदान झाले आहे. तसेच शेतकरी मोदी सरकारवर नाराज असल्याने तसेच अडसूळांविरुद्धची अँटी एन्कबन्सी ही त्यांना बाधक ठरू शकते. पण गेल्या चार निवडणुकांत अमरावतीकरांनी अडसूळांना निर्विवाद निवडून दिले आहेत. पण यंदा नवनीत कौर राणा आणि त्यांच्या पतींनी चांगली फिल्डिंग मतदार संघात लावल्याने ही निवडणूक आनंदरावांना अडसूळांना दुःखी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

२००९ च्या मतदानावर नजर टाकली असताना आनंदराव अडसूळ यांनी  गवई गटाच्या राजेंद्र गवई यांना केवळ ६७ हजार मतांनी पराभूत केले होते. पण यंदा अडसूळांचा लीड कमी होऊ शकतो. तसेच अमरावतीत वंचित बहूजन आघाडीचा फॅक्टर न चालल्याने ती मते नवनीत कौर राणा यांच्या पारड्यात जाऊ शकतात.  त्यामुळे अडसूळांना अडचणीचे ठरू शकते. 

(टाइम्स नाऊ मराठीने वरील लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. त्यानुसार हा अंदाज वर्तविण्याचा प्रयत्न आहे. ) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी