LIVE भंडारा गोंदिंया लोकसभा निवडणूक २०१९  : भाजपचे सुनिल मेंढे विजयी

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 23, 2019 | 22:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात भाजपने अखेरच्या क्षणी भंडाऱ्याचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना रिंगणात उतरवले तर राष्ट्रवादी काँग्रेसनाना पंचबुद्धे यांना उमेदवारी दिली आहे.

bhandara gondiya loksabha election results 2019
भंडारा गोंदिंया लोकसभा निवडणूक निकाल २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

भंडारा :  भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघ २०१८ पासून खूप घडामोडींनी समोर आला आहे. २०१४ मध्ये भाजपकडून नाना पटोले यांनी विजय मिळवला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. साधारण १ लाख ४९ हजार मतांनी नाना पटोले यांनी विजय मिळविला होता. पण नंतर मोदी सरकारच्या कारभारावर नाराज होऊन त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भंडारा गोंदियात पुन्हा पोटनिवडणूक झाली आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधवराव कुकडे यांनी बाजी मारली. त्यांनी भाजपच्या हेमंत पटले यांचा ४८ हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर याठिकाणी भाजप पर्व संपून राष्ट्रवादीचे पर्व सुरू झाले. 

LIVE UPDATES

  1. भाजपचे सुनिल मेंढे विजयी
  2. सुनिल मेंढे 176231 मतांनी आघाडीवर
  3. सुनिल मेंढे, भाजप 155184 मतांनी आघाडीवर
  4. सुनिल मेंढे, भाजप 79264 मतांनी आघाडीवर
  5. सुनिल मेंढे, भाजप 38045 मतांनी आघाडीवर
  6. भंडारा-गोंदिया सुनिल मेंढे, भाजप 37539 मतांनी आघाडीवर
  7. भंडारा-गोंदिया सुनिल मेंढे, भाजप १६२४३ मतांनी आघाडीवर
  8. थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

टाइम्स नाऊ मराठीचा ग्राऊंड 'सेंटी'मीटर रिपोर्ट

विदर्भात गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले होते. पण यंदा भंडारा गोंदियात त्यांना उमेदवार ठरवताना दमछाक झाली.  राष्ट्रवादीकडून दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांची उमेदवारी जाहीर होण्याची ते वाट पहात होते. पण अखेर त्यांनी कुणबी कार्ड खेळत भंडाऱ्याचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना रिंगणात उतरविले. राष्ट्रवादीने भाजपची खेळी लक्षात घेऊन काही तासांतच माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी जाहीर करून कुणबी विरूद्ध कुणबी कार्ड चालवले. 

शेतकऱ्यांच्या समस्यापाहून सरकारमध्ये असूनही नाना पटोले यांनी टीका करण्याचा सपाटा सुरू केला. त्यामुळे पटोले यांच्याबाबत सहानुभूतीची लाट होती. शेतकऱ्यांची नाराजी भाजपच्या विरोधात या ठिकाणी जाताना दिसत आहे.  पटोले काँग्रेसमध्ये गेल्यामुळे त्यांनी या ठिकाणाहून निवडणूक न लढवता थेट नागपुरात जाऊन नितीन गडकरी यांना कडवे आव्हान दिले. 

या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी नवे उमेदवार दिले आहेत. पण नाना पंचबुद्धे यांचा जिल्ह्यात संपर्क आहे. तसेच राज्यमंत्री असल्याने त्यांच्या नावाला चांगली पसंती मिळू शकते. या मतदार संघातील कुणबी मतदार हे येथील खासदार ठरवतील हे निश्चित झाले आहे. गेल्यावेळी पोटनिवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या पारड्यात मतं टाकली होती. तसेच आता म्हणावी तशी मोदी लाट नाही, त्यामुळे नाना पंचबुद्धे यांचे पारडे जड वाटते आहे. 
 

(टाइम्स नाऊ मराठीने वरील लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. त्यानुसार हा अंदाज वर्तविण्याचा प्रयत्न आहे. ) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
LIVE भंडारा गोंदिंया लोकसभा निवडणूक २०१९  : भाजपचे सुनिल मेंढे विजयी Description: भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात भाजपने अखेरच्या क्षणी भंडाऱ्याचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना रिंगणात उतरवले तर राष्ट्रवादी काँग्रेसनाना पंचबुद्धे यांना उमेदवारी दिली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola