अमित शहांच्या उपस्थितीत भाजपची पुन्हा मेगाभरती, युतीवरही होणार अंतिम निर्णय

विधानसभा निवडणूक २०१९
Updated Sep 20, 2019 | 10:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

BJP Mega Bharati: भारतीय जनता पक्षात सध्या नेत्यांचं जोरदार इनकमिंग सुरू आहे. आता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात एक मेगा भरती होणार असून या भरतीत कुठल्या नेत्यांचा भाजपत प्रवेश होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारय

BJP mega recruitment
भाजपची पुन्हा मेगाभरती  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • भाजपची रविवारी आणखीन एक मेगाभरती
  • आणखीन दिग्गज नेत्यांचा पुन्हा भाजपत प्रवेश होण्याची शक्यता
  • रविवारी भाजप अध्यक्ष अमित शहा सुद्धा मुंबईत
  • रविवारी नारायण राणे भाजपत प्रवेश करण्याची शक्यता

मुंबई: लोकसभा निवडणुकीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना लागलेली गळती काही थांबण्याचं दिसत नाहीये. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गज नेत्यांनी आतापर्यंत शिवसेना-भाजपत प्रवेश केला आहे. भारतीय जनता पक्षाने तर तीन मेगाभरती घेत अनेक दिग्गज नेत्यांना भाजपत प्रवेश देत विरोधी पक्षांना जोरदार झटका दिला. आहे.

आता भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एक मेगाभरतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय जनता पक्षाची ही चौथी मेगाभरती २२ सप्टेंबर रोजी मुंबईत पार पडणार आहे. मुंबईतील महिला आर्थिक विकास मंडळाच्या सभागृहात रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही मेगाभरती होणार असल्याचं वृत्त आहे. 

राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे भाजपत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे. मात्र, शिवसेनेमुळे नारायण राणे यांचा भाजप प्रवेश रखडला असल्याचं बोललं जात आहे. मात्र, आता रविवारी होणाऱ्या भाजपच्या चौथ्या मेगाभरतीमध्ये नारायण राणे भाजपत प्रवेश करणार असल्याचं समजतय. यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात झालेल्या भाजपच्या मेगाभरतीमध्ये तीन नेत्यांनी भाजपत प्रवेश केला होता. त्यानंतर आता भाजत कुठल्या नेत्यांचा प्रवेश होतो हे पहावं लागेल.

युतीच्या जागावाटपावर अंतिम निर्णय?

शिवसेना आणि भाजप यांच्यात जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये. भाजपला अधिक जागा हव्या आहेत तर शिवसेना फिफ्टी-फिफ्टी जागांच्या फॉर्म्युल्यावर ठाम आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे रविवारी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अमित शहा हे शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा तिढा सोडवत युतीची घोषणा करणार असल्याचं बोललं जात आहे.

शिवसेना आणि भाजपतील जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचं वृत्त समोर येत आहे आणि यानुसार शिवसेना १२६ जागांवर तर भाजप-मित्र पक्ष १६२ जागांवर निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच या जागावाटपच्या संदर्भातील अधिकृत घोषणा रविवारी अमित शहा यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...