अमित शहा फक्त ५ मिनिटं 'या' अभिनेत्याला भेटले, पाहा तेवढ्यात काय राजकारण घडलं...

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 21, 2019 | 10:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बॉलिवूड अभिनेता सनी देओल याची भेट घेतली आहे. अवघ्या ५ मिनिटांच्या या भेटीनंतर सनी देओल पंजाबच्या अमृतसर किंवा गुरदासपूरमधून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे

Amit_Shah_Comyan
अमित शहा फक्त ५ मिनिटं 'या' अभिनेत्याला भेटले!  |  फोटो सौजन्य: BCCL

पुणे: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुणे एअरपोर्टवर बॉलिवूड अभिनेता सनी देओलची भेट घेतली. शुक्रवारी संध्याकाळी या दोघांची ही भेट झाली. सनी देओल आणि अमित शहा यांची ही भेट अवघ्या काही मिनिटांसाठीच झाली. पण या भेटीनंतर सनी देओल लोकसभा निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता हेमामालिनी यांच्यापाठोपाठ सनी देओल देखील भाजपच्या गोटात दिसणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे या दोघांच्या भेटीचा फोटो हा सोशल मीडियात बराच व्हायरल होत आहे. 

अमित शहा आणि सनी देओल यांची भेट फक्त ५ मिनिटांसाठीच झाली. पण त्यानंतर सनी देओल हा पंजाबच्या अमृतसरमधून निवडणूक लढवू शकतो अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे भाजपचे जिल्हा अध्यक्ष योगेश गोगावले यांनी अमित शाह आणि सनी देओल यांच्या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण या भेटीनंतर नेमकी काय चर्चा झाली याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. 

याबाबत बोलताना योगेश गोगावले असं म्हणाले की, 'त्या दोघांची भेट झाली. पण त्या दोघांमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. अमित शाहा हे आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार बारामतीमध्ये आले होते. त्याचवेळी ते जेव्हा पुणे विमानतळावर थांबले होते त्याच वेळी सनी देओल देखील तिथे उपस्थित होता. त्यादरम्यान या दोघांमध्येही ५ मिनिटांसाठी भेट झाली. 

(फोटो सौजन्य: ANI)

२०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपचे वरिष्ठ नेते अरूण जेटली यांना अमृतसरमधून उमेदवारी देण्यात आली होती. पण जेटली यांना काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पराभूत केलं होतं. याआधी या जागेवर नवज्योत सिंह सिद्धू २००४ आणि २००९ भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. 

दरम्यान, २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपने अमृतसरमधून नवज्योत सिंह सिद्धूला तिकीट दिलं नव्हतं. त्यामुळे असं म्हटलं जातं की, सिद्धू भाजप सोडण्यामागचं हे देखील एक मोठ कारण आहे. त्यानंतर पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीआधीच नवज्योत सिंह सिद्धूने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

पंजाबमध्ये सर्व १० जागांसाठी होणारं मतदान हे शेवटच्या टप्प्यात म्हणजेच १९ मे रोजी करण्यात येणार आहे. तर मतदानाचा निकाल हा २३ मे रोजी जाहीर होणार आहे. 

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
अमित शहा फक्त ५ मिनिटं 'या' अभिनेत्याला भेटले, पाहा तेवढ्यात काय राजकारण घडलं... Description: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बॉलिवूड अभिनेता सनी देओल याची भेट घेतली आहे. अवघ्या ५ मिनिटांच्या या भेटीनंतर सनी देओल पंजाबच्या अमृतसर किंवा गुरदासपूरमधून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे
Loading...
Loading...
Loading...