बसप समर्थकाने चुकीने भाजपला दिले मत, बोट कापून दिली स्वत:ला शिक्षा

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 19, 2019 | 08:02 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

बुलंदशहरमध्ये मतदानादरम्यान एका व्यक्तीने चुकून महागठबंधनच्या ऐवजी भाजपच्या समर्थनार्थ मतदान केलं. या व्यक्तीला जेव्हा आपल्या चुकीची जाणीव झाली तेव्हा त्याने स्वत:ला शिक्षा दिली.

evm machine
ईव्हीएम मशीन 

मुंबई: मतदानाच्या माध्यमातून आपण आपल्याला हवा असलेला उमेदवार निवडतो. मतदान हे केवळ एखाद्या उमेदवारासाठी विजय किंवा पराजयासाठी जबाबदार नसते तर त्याद्वारे आपल्या आवडत्या उमेदवाराच्या प्रती प्रेम आणि विश्वास दाखवते. समजा तुम्ही मतदान केंद्रावर गेलात आणि तुम्हाला ज्या व्यक्तीला मतदान करायचे आहे त्याच्याऐवजी दुसऱ्या उमेदवारासमोरचे बटण दाबले तर तुम्ही म्हणाला जे झाले ते झाले. ही गोष्टी तुम्ही इतकी मनाला लावून घेणार नाहीत. मात्र उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये जे घडले ते खरंच हैराण करणारे होते. तिथे जे काही घडले त्यावर तुम्हाला विश्वास ठेवणे कठीण होईल. 

चुकीला माफी नाही...

हे प्रकऱण उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील शिकारपूर येथील आहे. येथे एका बसपच्या समर्थकाने छोटीशी चूक केली. त्याने हत्तीसमोरच्या निशाणीवर बटण दाबण्याऐवजी कमळासमोरील बटण दाबले. त्याने ही चूक केली. मात्र त्याला जेव्हा हे लक्षात आले तेव्हा त्याने स्वत:ला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. अब्दुल्लापूर हुलसान गावांत राहणाऱ्या पवन कुमार या व्यक्तीने स्वत:ला शिक्षा देताना स्वत:चे बोट कापले. पवनकुमारला महागठबंधनच्या उमेदवाराला मत द्यायचे होते. मात्र मतदानादरम्यान त्याच्याकडून चूक झाली आणि दुसऱ्याच व्यक्तीला मत दिले. 

मतदानाची टक्केवारी वाढली

वरिष्ठ निवडणूक आयुक्त उमेश सिंगा यांनी सांगितले, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली. तर ओडिसामध्ये मतदानाची टक्केवारी घटली. आयोगाच्या आकडेवारीनुसार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उत्तर प्रदेशातील आठ जागांवर ६२.३ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीतील मतदानाच्या तुलतेनत हे कमी आहे. यासोबतच आयोगाने दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी जाहीर केली आहे. दोन्ही टप्पे मिळून आतापर्यंत १८६ जागांवर उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये कैद झाले आहे.

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान 

आतापर्यंत लोकसभेच्या दोन टप्प्यांसाठी मतदान पार पडले आहे. दुसऱ्या टप्प्यात देशआत ६६ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात ६२ टक्के मतदान  आणखी पाच टप्प्यातील मतदान बाकी आहे. देशभरातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदानासाठी उत्साह पाहायला मिळत आहे. पुढील मतदान २३ एप्रिलला होणार आहे. त्यानंतर २९ एप्रिल, ६ मे, १२ मे आणि १९ मेला मतदान पार पडणार आहे. 

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बसप समर्थकाने चुकीने भाजपला दिले मत, बोट कापून दिली स्वत:ला शिक्षा Description: बुलंदशहरमध्ये मतदानादरम्यान एका व्यक्तीने चुकून महागठबंधनच्या ऐवजी भाजपच्या समर्थनार्थ मतदान केलं. या व्यक्तीला जेव्हा आपल्या चुकीची जाणीव झाली तेव्हा त्याने स्वत:ला शिक्षा दिली.
Loading...
Loading...
Loading...