बुलढाणा लोकसभा निवडणूक २०१९  :  राजेंद्र शिंगणेंना भाजपविरोधी नाराजीचा फायदा? 

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 22, 2019 | 17:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

बुलढाणा लोकसभा मतदार संघात एकूण १२ उमेदवार होते. यावेळी शिवसेनेने प्रतापराव जाधव यांना पुन्हा उमेदवारी दिली असून त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे आहेत. 

buldhana loksabha election results 2019
बुलढाणा लोकसभा निवडणूक निकाल २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

बुलढाणा :  बुलढाणा लोकसभा मतदार संघात  गेल्या वेळी मोदी लाटेत भाजपच्या शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांचा सुमारे २ लाख ४० हजार मतांनी विजय झाला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कृष्णराव इंगळे यांचा पराभव केला होता. यंदा भाजपने पुन्हा प्रतापरावांवर हा किल्ला लढविण्याची जबाबदारी दिली आहे.  बसपाकडून हाफिज अझीज तर वंचित बहुजन आघाडीकडून बळीराम शिरस्कर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

टाइम्स नाऊ मराठीचा ग्राऊंड 'सेंटी'मीटर रिपोर्ट

बुलढाणा लोकसभा मतदार संघाचा विचार करता यंदा  मुस्लिम, दलित आणि शेतकऱ्यांची मोदी सरकार तसेच राज्य सरकार विरोधातील नाराजीचा फटका हा शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांना बसण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे यांना होऊ शकतो. शेतकरी मोठ्या प्रमाणात या मतदार संघात नाराज आहे. शेतीचे प्रश्न हातळण्यात भाजपला आलेले अपशय हे मुख्य कारण आहे.  त्यामुळे या मतदार संघातील हवा ही आघाडीच्या दिशेने फिरताना दिसत आहे. 

प्रतापराव जाधव यंदा विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. पण त्यांना यंदाची निवडणूक डोकेदुखी ठरली आहे. म्हणावा तसा प्रतिसाद मतदारांनी त्यांना दिलेला दिसत नाही. अँन्टीएन्कबन्सीचा फटका जाधव यांना बसू शकतो. 

तर दुसरीकडे २००९ च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राजेंद्र शिंगणे मैदानात उतरले आहेत.  २००९ च्या निवडणुकीत प्रतापराव जाधव यांनी शिंगणे यांचा केवळ २८ हजार मतांनी पराभव केला होता. 

बुलढाण्यातील चिखली आणि बुलढाणा या विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा कब्जा आहे. तर सिंदखेड राजा आणि मेहर या जागा शिवसेनेकडे आहे. तर जळगाव जामोद आणि खामगाव या जागा भाजपकडे आहेत. 

 


(टाइम्स नाऊ मराठीने वरील लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. त्यानुसार हा अंदाज वर्तविण्याचा प्रयत्न आहे. ) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बुलढाणा लोकसभा निवडणूक २०१९  :  राजेंद्र शिंगणेंना भाजपविरोधी नाराजीचा फायदा?  Description: बुलढाणा लोकसभा मतदार संघात एकूण १२ उमेदवार होते. यावेळी शिवसेनेने प्रतापराव जाधव यांना पुन्हा उमेदवारी दिली असून त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे आहेत. 
Loading...
Loading...
Loading...