'त्यांची भाषणे म्हणजे फक्त मनोरंजन,' मुख्यमंत्री फडणवीसांची बोचरी टीका

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 21, 2019 | 17:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ahmednagar election: अहमदनगर निवडणूक आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशावेळी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आता वेगाने झडू लागल्या आहेत. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विरोधकांवर तोंडसुख घेतलं आहे. 

Cm devendra fadnavis
'त्यांची भाषणे म्हणजे फक्त मनोरंजन,' मुख्यमंत्री फडणवीसांची बोचरी टीका  |  फोटो सौजन्य: Times Now

अहमदनगर: 'कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला तो फक्त कोंबड्या विकण्याचा धंदा आहे. त्यांनी ५० वर्षात कोणाला काही दिलेले नाही आणि आता ते फक्त देशाचे पंतप्रधान मोदी यांच्यावर भाषणं करत आहेत. आता त्यांना झोपेतसुध्दा मोदीच दिसत असल्याने त्यांचे भाषण फ़क्त मनोरंजन म्हणूनच पाहा.' अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

अहमदनगर मतदारसंघाची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा वेळी अहमदनगर मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेते मंडळींनी सभांचा धडाका लावला आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुजय विखेंसाठी एक सभा घेतली. याच सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे. 

'आमच्या विरोधकांनी जाहीरनामा प्रसिध्द केला आहे. मात्र त्यांचा जाहीरनामा हा कोंबड्या विकण्याचा धंदा आहे, त्यांनी ५० वर्षात कोणाला काहीही दिले नाही आणि आता फ़क्त ते मोदींवर भाषणं करत आहेत. मात्र त्यांचे भाषणे हे फ़क्त मनोरंजन झाले आहे.' अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली आहे. पण यावेळेस त्यांनी कुणाचंही नाव न घेता ही टीका केली आहे. 

'काही दिवसांनी तर चॅनलवालेसुध्दा त्यांची भाषणं दाखवायच्या अगोदर 'हे भाषण काल्पनिक आहे जनेतेने आपल्या जबाबदारीवर ही भाषणं पाहावीत' अशी बोचरी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या टीकेला आता विरोधक नेमके कसे उत्तर देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. 

अहमदनगर मतदारसंघात 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून भाजपा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात या लोकसभेची सरळ-सरळ लढत होणार आहे त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेते मंडळीनी अहमदनगरची निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक मानली असल्याने या मतदारसंघात नेते मंडळीच्या अक्षरश: तंबू ठोकून बसले आहेत.  

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्यासाठी स्वत: शरद पवार जोर लावत आहे. त्यामुळे आता अहमदनगरमधील ही निवडणूक खूपच अटीतटीची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारतं याकडेच सगळ्याचे लक्ष लागून राहिलं आहे. 

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
'त्यांची भाषणे म्हणजे फक्त मनोरंजन,' मुख्यमंत्री फडणवीसांची बोचरी टीका Description: Ahmednagar election: अहमदनगर निवडणूक आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशावेळी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आता वेगाने झडू लागल्या आहेत. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विरोधकांवर तोंडसुख घेतलं आहे. 
Loading...
Loading...
Loading...