बॉक्सर विजेंदर सिंह काँग्रेसचा उमेदवार, या जागेवरून लढवणार निवडणूक

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 23, 2019 | 11:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

काँग्रेस पक्षानं दक्षिण दिल्लीतून बॉक्सर विजेंदर सिंह याला उमेदवारी जाहीर केली आहे. दिल्लीमध्ये १२ मे रोजी सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे आता बॉक्सर विजेंदर यांनं देखील राजकारणात उडी घेतली आहे.

Vijender Singh
विजेंदर सिंह   |  फोटो सौजन्य: Instagram

Lok Sabha Elections 2109 Congress fields Indian boxer vijender singh from south delhi: काँग्रेस पक्षानं बॉक्सर विजेंदर सिंह याला दिल्लीच्या दक्षिण दिल्लीतून उमेदवारी जाहीर केली आहे. विजेंदरला उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसच्या दिल्लीतील सर्व सात जागांवरचे उमेदवार निश्चित झाले आहेत. याआधी सोमवारी सकाळी काँग्रेसनं ६ उमेदवारांची नावं निश्चित केली होती. पश्चिम दिल्लीतून महाबल मिश्रा, उत्तर पश्चिम दिल्लीतून राजेश लिलोठिया, नवी दिल्लीतून अजय माकन, पूर्व दिल्लीतून अरविंदर सिंह लवली, उत्तर पूर्व दिल्लीतून शीला दिक्षीत आणि चांदनी चौकमधून जेपी अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहेत. 

दक्षिण दिल्लीमध्ये विजेंदर याचा लढा भाजपच्या रमेश बिधूडी आणि आम आदमी पक्षाचे राघव चड्ढा यांच्याशी होणार आहे. दिल्लीमध्ये १२ मे रोजी मतदान होणार आहे. राजकारणात एन्ट्री केल्यानंतर विजेंदरनं ट्विट केलं की, बॉक्सिंगच्या माझ्या करिअरच्या २० वर्षांहून अधिक काळात मी नेहमीच माझ्या देशाला रिंगमध्ये सन्मानित केलं आहे. माझ्या देशवासियांसाठी काही तरी करावं आणि त्यांची सेवा करण्याची आता वेळ आली आहे. मी या संधाची स्विकार करतो. काँग्रेस पक्ष, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे आभार मानतो. 

दक्षिण दिल्लीतून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बिधुरी यांनी एक लाखांहून अधिक मतांच्या फरकानं विजय मिळवला होता. त्यांनी कर्नल देविंदर सेहरावत यांना पराभूत केलं होतं. याआधी विजेंदर सिंहनं हरियाणा पोलिसाचा राजीनामा दिला होता. विजेंदरनं २००८च्या बिजींग ऑलिम्पिकमध्ये भारत देशाल कांस्य पदक मिळवून दिलं होतं.  दरम्यान काँग्रेस लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण ४२२ उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. ज्यात यूपीए प्रमुख सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं देखील नाव आहे. 

माजी क्रिकेटर गौतम गंभीरला भाजपकडून पूर्व दिल्लीतून तिकीट

काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला पूर्व दिल्ली येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली. सोमवारी भाजपकडून पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत सध्याचे भाजपचे खासदार महेश गिरी यांचे तिकीट कापण्यात आले आहे. गौतम गंभीरचा थेट लढा काँग्रेसच्या पूर्व दिल्लीतून अरविंदर सिंह लवली यांच्याशी होणार आहे. 

त्यामुळे आता खेळाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे हे खेळाडू राजकारणात आपला कसा ठसा उमटवणार ते पाहावं लागेल त्यासोबतच लोक देखील यांना मैदानाप्रमाणंच पसंती देणार का असाच प्रश्न आहे.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बॉक्सर विजेंदर सिंह काँग्रेसचा उमेदवार, या जागेवरून लढवणार निवडणूक Description: काँग्रेस पक्षानं दक्षिण दिल्लीतून बॉक्सर विजेंदर सिंह याला उमेदवारी जाहीर केली आहे. दिल्लीमध्ये १२ मे रोजी सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे आता बॉक्सर विजेंदर यांनं देखील राजकारणात उडी घेतली आहे.
Loading...
Loading...
Loading...