दिल्ली :  काँग्रेसने जाहीर केली उमेदवारांची लिस्ट, शीला दीक्षित आणि मनोज तिवारी असणार आमने-सामने 

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 22, 2019 | 13:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

भाजपनंतर आता काँग्रेसने आता दिल्लीतील सात लोकसभा जागांपैकी सहा जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. 

manoj tiwari and sheela dixit
भाजपकडून मनोज तिवारी आणि काँग्रेसकडून शीला दीक्षित आमने  

नवी दिल्ली :  दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या आघाडीच्या शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे. रविवारी भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केली होती. आता दिल्लीतील सात पैकी सहा जागांसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाने दिल्ली प्रदेश काँग्रेस अध्यक्ष शीला दीक्षित यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. उत्तर पूर्व दिल्लीतून भाजपचे उमेदवार मनोज तिवारी यांच्या विरोधात दीक्षित यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  तर चांदनी चौक येथून पक्षाने कपिल सिब्बल यांच्या ऐवजी दिल्ली काँग्रेसचे माजी अध्यक्ष जेपी अग्रवाल यांना मैदानात उतरविले आहे. 

काँग्रेसकडून कोणाला मिळालेले कुठून तिकीट 

 1. पश्चिम दिल्ली- महाबल मिश्रा
 2. उत्तर पश्चिम दिल्ली- राजेश लिलोठिया
 3. नई दिल्ली- अजय माकन
 4. पूर्वी दिल्ली- अरविंदर सिंह लवली
 5. उत्तर पूर्व दिल्ली- शीला दीक्षित 
 6. चांदनी चौक- जेपी अग्रवाल

 
भारतीय जनता पक्षाने (भाजप) लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीच्या चार जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाने चांदनी चौक येथून डॉ. हर्षवर्धन, उत्तर पूर्व दिल्ली (नॉर्थ ईस्ट दिल्ली)तून मनोज तिवारी, पश्चिम दिल्ली (वेस्ट दिल्ली) येथून प्रकाश वर्मा दक्षिण दिल्ली येथून रमेश बिधुडी यांना तिकीट दिले आहे. 

भाजपकडून कोणाला मिळालेले कुठून तिकीट 

 1. पश्चिम दिल्ली- प्रकाश वर्मा
 2. दक्षिण दिल्ली -  रमेश बिधुडी
 3. उत्तर पूर्व दिल्ली- मनोज तिवारी
 4. चांदनी चौक- डॉ. हर्षवर्धन

तर आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची मार्चमध्ये घोषणा केली होती. पक्षाने नवी दिल्ली येथून ब्रजेश गोयल, पूर्व दिल्लीतून अतिशी, उत्तर पूर्व दिल्लीतून दिलीप कुमार पांडे, दक्षिण दिल्लीतून राघव चड्ढा, चांदनी चौक येथून पंकज गुप्ता, उत्तर पश्चिम दिल्लीतून गगन सिंह, पश्चिम दिल्लीतून बलबीर सिंह जाखड यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. 

आपकडून कोणाला मिळालेले कुठून तिकीट 

 1. पश्चिम दिल्ली-  बलबीर सिंह जाखड
 2. उत्तर पश्चिम दिल्ली-  गगन सिंह
 3. नई दिल्ली-  ब्रजेश गोयल
 4. पूर्व दिल्ली- अतिशी
 5. उत्तर पूर्व दिल्ली-  दिलीप कुमार पांडे
 6. चांदनी चौक- पंकज गुप्ता
 7. दक्षिण दिल्ली -  राघव चड्ढा

दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्या आघाडी संदर्भात शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम होता.  काँग्रेसला केवळ दिल्लीतच आम आदमी पक्षाशी आघाडी करायची होती. तर आपने पंजाब, हरियाणा आणि दिल्लीत १८ जागांसाठी काँग्रेससोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. 

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिल्ली :  काँग्रेसने जाहीर केली उमेदवारांची लिस्ट, शीला दीक्षित आणि मनोज तिवारी असणार आमने-सामने  Description: भाजपनंतर आता काँग्रेसने आता दिल्लीतील सात लोकसभा जागांपैकी सहा जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. 
Loading...
Loading...
Loading...