सर्व मोदी चोर कसे' म्हटल्याप्रकरणी राहुल गांधी अडचणी, सुशील मोदींनी दाखल केला गुन्हा 

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 18, 2019 | 19:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. सर्व मोदी चोर कसे या वक्तव्यावरून बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेता सुशील कुमार मोदी यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला

Rahul gandhi
राहुल गांधी  

पाटणा :  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भाजप नेता आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी गुरूवारी राहुल गांधी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.  भाजप नेत्याने ही केस राहुल गांधी यांच्या 'सर्व मोदी चोर कसे' या वक्तव्यावरून दाखल केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचार सभेत 'सर्व मोदी चोर कसे' असे म्हटले होते. राहुल गांधी यांच्या या विधानानंतर भाजपने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

सुशील मोदी यांनी मीडियाला सांगितले की, त्यांच्या वकिलांनी मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० नुसार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात केस दाखल केली आहे.  यावर येत्या २२ एप्रिल रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. भाजप नेत्याने मंगळवारी म्हटले राहुल यांच्या विरोधात केस दाखल करणार आहोत, त्यांनी मोदी आडनाव असलेल्या सर्व व्यक्तींच्या भावना दुखावल्या आहेत. 

मोदी म्हणाले, मी राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून खूप दुःखी झाले आहे. त्यांनी सभेत बोलताना म्हटले ज्यांच्या नावासमोर मोदी लागले ते सर्व चोर आहेत. पंतप्रधान मोदी यांचा अपमान झाला आहे, तसेच मला वैयक्तीक रित्या खूप वाईट वाटले आहे. कारण माझ्या नावापुढेही मोदी आडनाव लागले  आहे. त्यामुळे मी त्यांच्या विरोधात केस दाखल करणार आहे. 

गेल्या सोमवारी नांदेडमध्ये एका निवडणूक प्रचार सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, की मी हैराण आहे की सर्व चोरांच्या नावापुढे मोदी नाव कसे आहे. राहुल गांधी यांचा इशारा आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी, भारतातून पळून गेलेला हिरा व्यापारी नीरव मोदी आणि राफेल विमान करारात भ्रष्टाचाराचे आरोप लावत पंतप्रधान चौकीदारच्या घोषणद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांवरही तोफ डागली होती. 

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सर्व मोदी चोर कसे' म्हटल्याप्रकरणी राहुल गांधी अडचणी, सुशील मोदींनी दाखल केला गुन्हा  Description: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. सर्व मोदी चोर कसे या वक्तव्यावरून बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेता सुशील कुमार मोदी यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला
Loading...
Loading...
Loading...