Video : 'मेरी मर्जी' वाल्या देवांग पटेलचे नवे रॅप सॉंग, आएगा तो मोदी ही...

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 20, 2019 | 17:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

 मैं चाहे ये करू मैं चाहे वो करू मेरी मर्जी' गाण्याने फेमस झालेल्या देवांग पटेल यांने भाजपच्या समर्थनार्थ एक नवीन रॅप सॉंग आणले आहे. चौकीदार रॅपच्या माध्यमातून भाजपने हे रॅप साँग प्रसिद्ध केले आहे. 

chowkidar
चौकीदार रॅपच्या माध्यातून भाजपचा विरोधकांवर निशाणा  |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली :  लोकसभा निवडणुकीतील दोन टप्पे पार पडले असून अजून पाच टप्पे शिल्लक असताना भाजपने प्रचार तंत्रात आता गाण्याचा वापर करण्याचे ठरवले आहे. ' मेरी मर्जी' गाण्याने प्रसिद्ध झालेल्या दिवांग पटेल याने 'करन अर्जुन आए न आएं, पर आएगा तो मोदी ही' हे नवे गाणे या प्रचाराच्या रणधुमाळीत आणले आहे. चौकीदार रॅपच्या माध्यमातून भाजपकडून हे गाणे प्रसिद्ध करण्यात आले आहे. या गाण्याचे लेखन विनय दवे यांनी केले आहे. 

राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप लावत चौकीदार चोर असल्याची घोषणा दिली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने मैं भी चौकीदार हे अभियान सुरू केले होते. पंतप्रधान मोदींपासून त्यांचे मंत्री आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नावापुढे चौकीदार हे नाव लावले होते. आता देवांग पटेलच्या या नव्या गाण्याच्या माध्यमातून विरोधी पक्षांना प्रत्युत्तर देण्याचे भाजपने ठरवले आहे. 

या गाण्यात राहुल गांधी, मेहबुबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला आणि कन्हैय्या कुमार यांना कोपरखळ्या, चिमटे आणि टोमणे मारण्याचा प्रयत्न केला आहे. कोणी काहीही केले तरी पुन्हा मोदी सत्तेवर येणार असल्याचे या गाण्याचे बोल आहेत. 

राहुल गांधी यांनी आक्रमकपणे राफेल मुद्दा उचलून धरला आहे, या माध्यमातून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आहे. त्याचा आधार घेत राहुल गांधींना पुन्हा पप्पू म्हणून या गाण्यात संबोधण्यात आले आहे. या प्रकरणी कितीही कांगावा केला, आरडाओरडा केला तरी मोदी सत्तेत येणार असा ठाम विश्वास या गाण्यातून व्यक्त केला आहे.  ममता, लालू, मायावती, अखिलेश यादव यांचाही या गाण्यात उल्लेख आहे. हे सर्वजण जातीय तेढ निर्माण करत आहे, त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी मोदी येणार असा चिमटा यात काढण्यात आला आहे. 

देवांग पटेल याने चौकीदाराचा ड्रेस परिधान केला असून आपल्या पाच सहा डान्सरसह एका पार्कींग लॉटमध्ये हे सर्व गाणे चित्रित करण्यात आले आहे. 

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Video : 'मेरी मर्जी' वाल्या देवांग पटेलचे नवे रॅप सॉंग, आएगा तो मोदी ही... Description:  मैं चाहे ये करू मैं चाहे वो करू मेरी मर्जी' गाण्याने फेमस झालेल्या देवांग पटेल यांने भाजपच्या समर्थनार्थ एक नवीन रॅप सॉंग आणले आहे. चौकीदार रॅपच्या माध्यमातून भाजपने हे रॅप साँग प्रसिद्ध केले आहे. 
Loading...
Loading...
Loading...