माढ्यातील काही मुलं खूपच गद्दार निघाली, धनंयजय मुंडेंचा घणाघात

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 20, 2019 | 18:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

माढा लोकसभा मतदार संघात प्रचार करताना विधानसभा विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मोहिते पाटील घराण्यावर तोफ डागली. गद्दार म्हणून त्याच्यावर खोचक टीका केली. 

Dhananjay Munde
धनंजय मुंडे यांनी माढा येथे मोहिते पाटील यांच्यावर टीका केली.  |  फोटो सौजन्य: Twitter

कुर्डुवाडी :  माढा लोकसभा मतदार संघातील काही मुलं खूपच गद्दार निघाली, त्यांनी घरातील माणसांचा हात सोडून दुसऱ्यांचा हात धरणं पसंत केलं, पवार साहेबांनी त्यांना काय कमी केले होते, खोचक टोला राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी लगावला. माढ्यातील जनता आजही राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार साहेबांवर प्रचंड प्रेम करणारी आहे, येत्या २३ मे रोजी माढ्यातील जनता सर्वांचा योग्य तो हिशेब करेल, असे सूचक टोला मोहिते पाटील यांना मुंडे यांनी लगावला आहे. 

लोकसभेच्या माढा मतदार संघातील कुर्डुवाडी येथे महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या प्रचार सभेत धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी मुंडे म्हणाले, माढा हा राष्ट्रवादीचा बाल्लेकिल्ला आहे. पण यात भाजपने डाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, कोणताही डाव असेल तरी ते उलथून लावण्याची धमक संजय मामा शिंदे यांच्यामध्ये आहे. माढा मतदार संघातील जनतेच्या साथीने संजय मामा यांचे यश निश्चित असल्याचे विश्वास मुंडे यांनी यावेळी व्यक्त केले. 

भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये देशाला पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही तर 'सपनों का सौदागर दिला होता, या सौदागर फक्त स्वप्न दाखवली आणि सर्वांना फसवले. शेतकऱ्यांना फसवले, कष्टकऱ्यांना फसवले, दलितांना फसवले, धनगरांना फसवल्याची टीका धनंजय मुंडे यांनी यावेळी केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत येऊ सांगितले, भाजपला मतदान करा पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो, आज पाच वर्ष झाली तरी तो सोन्याचा दिवस उजाडला नाही. आरक्षण तर दिलेच नाही, पण धनगर समाजाच्या आरक्षणाची फाइल हरवल्याची कबुली थेट कोर्टात दिली. 'फसवणीस' सरकारचा बदला घेण्याची आता वेळ आली आहे, असे आवाहन मुंडे यांनी यावेळी केले. 

मुंबई हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांच्या विषयी आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या साध्वी प्रज्ञा सारख्या आरोपींना लोकसभेसाठी उमेदवारी देणाऱ्या भाजप सरकारला लाज कशी नाही वाटत, असा सवालही मुंडे यांनी यावेळी केला. 

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
माढ्यातील काही मुलं खूपच गद्दार निघाली, धनंयजय मुंडेंचा घणाघात Description: माढा लोकसभा मतदार संघात प्रचार करताना विधानसभा विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मोहिते पाटील घराण्यावर तोफ डागली. गद्दार म्हणून त्याच्यावर खोचक टीका केली. 
Loading...
Loading...
Loading...