शिंदे-फडणवीस सरकारची आज खरी परीक्षा, बहुमत चाचणी होणार; सत्ताधारी-विरोधक येणार आमनेसामने

विधानसभेचं अध्यक्षपद जिंकत शिंदे-भाजपा सरकारने मोठा विजय मिळवला आहे. मात्र आज शिंदे सरकारची खरी कसोटी आहे.

Eknath Shinde
एकनाथ शिंदे  
थोडं पण कामाचं
  • राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या सरकारची आज विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे.
  • आज शिंदे आणि फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
  • आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु होणार आहे.

मुंबई: राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या सरकारची आज विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. आज शिंदे आणि फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु होणार आहे. आवाजी मतदानानं बहुमत चाचणी होणारेय. विधानसभेचं अध्यक्षपद जिंकत शिंदे-भाजपा सरकारने मोठा विजय मिळवला आहे. मात्र आज शिंदे सरकारची खरी कसोटी आहे. आजच्या निकालानंतर 21 जूनपासून राज्यात सुरू असलेलं राजकीय संकट संपणार आहे. म्हणजेच आज शिंदे विधानसभेत आपले सरकार बहुमतात असल्याचे सिद्ध करतील.

आज सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहे. . महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज आज सकाळी 11 वाजता सुरू होणार असून बहुमत सिद्ध करण्यासाठी शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक ठराव आणला जाणार आहे. त्यानंतर या प्रस्तावावर मतदान होईल. मात्र शिंदे सरकार प्रचंड बहुमताने विश्वास संपादन करेल, असा विश्वास भाजपनं व्यक्त केला आहे. आम्ही 166 मतांनी बहुमत सिद्ध करू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. 

अधिक वाचा-  आदित्य ठाकरे आमदारकीचा राजीनामा देणार?

राहुल नार्वेकर महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष 

भाजपचे आमदार राहुल नार्वेकर महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष झाले. बहुमताने त्यांची निवड झाली. नार्वेकर यांना 164 मते मिळाली. यानंतर नव्या विधानसभाध्यक्षांचे अभिनंदन करण्यासाठी झालेल्या भाषणांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांचे कौतुक केलं. तसंच राहुल नार्वेकर देशातील सर्वात तरुण विधानसभाध्यक्ष असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

अधिक वाचा- राज्यात 5-6 महिन्यात मध्यवर्ती निवडणुका होणार?, शरद पवार यांनी NCPच्या आमदारांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी जारी केला व्हीप

विशेष म्हणजे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांनी सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांच्या बाजूने मतदान करण्यासाठी पक्षाचे आमदार वेगळे करण्याचा निर्णय घेतला आणि स्वतंत्र व्हिप जारी केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी