वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंहला निवडणूक आयोगाची नोटीस

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 20, 2019 | 19:04 IST | टाइम्स नाऊ हिंदी

भाजप नेता साध्वी प्रज्ञा ठाकूरला निवडणूक आयोगानं माजी एटीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याबाबत नोटीस बजावली आहे. साध्वीला एका दिवसांत निवडणूक आयोगाच्या नोटीसला उत्तर द्यायचंय.

Pradnya Thakur
साध्वी प्रज्ञा ठाकूर (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: ANI

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या साध्वी प्रज्ञा ठाकूरला भोपाळच्या जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. शहीद एटीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत साध्वीनं वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल ही नोटीस बजावण्यात आली. निवडणूक अधिकारी यांनी याबाबत सांगितलं की, साध्वीनं हेमंत करकरेंबाबत केलेलं विधान म्हणजे आदर्श आचार संहितेचं उल्लंघन आहे. आयोगानं साध्वी प्रज्ञा सिंहला एका दिवसाच्या आत नोटीशीला उत्तर मागितलंय.

साध्वीनं म्हटलं होतं की, हेमंत करकरे यांनी साध्वीसोबत खूप वाईट वागणूक केली होती म्हणून त्यांनी त्यांच्या कर्मामुळं जीव गमवला. मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले होते. साध्वीच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर चारही बाजूनं टीकेची झोड उठली आहे. विरोधी पक्षानं साध्वीच्या या वक्तव्यावरून भाजप सरकारला टार्गेट केलंय. यानंतर भाजपनं एक पत्रकार परिषद घेत आमचा पक्ष हेमंत करकरेंना नेहमी शहीद मानतात, असं स्पष्ट केलं. ते दहशतवाद्यांसोबत शूरपणे लढत वीरगतीला प्राप्त झाले. पक्षानं साध्वीच्या वक्तव्याला संपूर्णपणे वैयक्तिक म्हटलं आहे.

 

 

पक्षाच्या या स्पष्टीकरणानंतर साध्वीनंही आपल्या वक्तव्याबाबत क्षमा मागत आपल्या वक्तव्यानं देशाच्या शत्रूंना फायदा मिळत असल्याचं म्हटलं. म्हणून मी आपलं वक्तव्य वापस घेत असल्याचं त्या म्हणाल्या. साध्वीनं सोबतच हे म्हटलं की, ते त्यांचं व्यैयक्तिक दु:ख होतं आणि हेमंत करकरे शत्रू राष्ट्रातील दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी मारले गेले, ते निश्चितपणे शहीद झाले.

सोबतच साध्वीनं मी माफी मागितली आहे, पण माझा जो ९ वर्ष छळ झाला आहे, त्या लोकांकडून तुम्ही माफी मागवू शकता का? जर तुम्हांला १५ ते २० पुरूष बेल्टनं मारहाण करत असतील नंतर तुम्हांला विवस्त्र करून उलटं टांगून ठेवत असतील तर तुम्ही काय करणार? असा प्रति प्रश्न साध्वीनं प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला केला.   

साध्वी प्रज्ञा सिंह २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी होत्या. त्यांना या प्रकरणात क्लीनचिट मिळाली आहे. भाजपनं यावेळी साध्वीला मध्य प्रदेशच्या भोपाळ लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या दिग्विजय सिंहाच्या विरोधात मैदानात उतरवलं आहे.
 

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंहला निवडणूक आयोगाची नोटीस Description: भाजप नेता साध्वी प्रज्ञा ठाकूरला निवडणूक आयोगानं माजी एटीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याबाबत नोटीस बजावली आहे. साध्वीला एका दिवसांत निवडणूक आयोगाच्या नोटीसला उत्तर द्यायचंय.
Loading...
Loading...
Loading...