विविध वाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएकडे सत्ता 

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 19, 2019 | 20:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

लोकसभेच्या ७ व्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर देशातील सर्व वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल सादर केला. यात एनडीएला फायदा होताना दिसत आहे. 

ALL EXIT POLL
सर्व वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई :  जगातील सर्वात मोठ्या निवडणुकीचा सातवा टप्पा संपल्यानंतर कोण केंद्रात सत्ता स्थापन करू शकतो, हे आकड्यांच्या बाबतीत अंदाज व्यक्त करण्यासाठी देशातील विविध वृत्तवाहिन्यांनी सर्वेक्षण एजन्सीच्या मदतीने एक्झिट पोल सादर केला. या एक्झिट पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा एनडीए सत्ता स्थापन करताना दिसत आहे.  सर्वच्या सर्व एक्झिट पोलमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना सत्ता स्थापनेसाठी पूर्ण बहुमत मिळणार असल्याचे दिसत आहे. 

टाइम्स नाऊचा अंदाज 

टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरने केलेल्या सर्वेक्षणात देशातील सात टप्प्यातील निवडणुकीत एनडीएला एकूण ३०६ जागा मिळताना दिसत आहे. तर यूपीए १३२ जागा मिळवताना दिसत आहे. तर इतर पक्ष हे १०४ जागा मिळवू शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे 

सी वोटरचा अंदाज

सी-वोटरने केलेल्या सर्वेक्षणात एनडीएला एकूण २८७ जागा मिळणार आहेत. तर यूपीएला १२८ च्या आसपास जागा मिळू शकतात, तर सपा-बसपा आणि इतर पक्षांना एकूण १२७ जागा मिळतील असा अंदाज आहे. 

जन की बातचा अंदाज 

जन की बात या सर्वेक्षण संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात एनडीएला एकूण ३०५ जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. तर यूपीएला १२४ जागा मिळू शकतात. तर इतरांच्या खात्यात ११३ जागा मिळण्याची शक्यता आहे. 

चाणक्यचा अंदाज 

चाणक्यने केलेल्या सर्वेक्षणात एनडीएला सर्वाधिक ३४० जागा मिळू शकतात असे म्हटले आहे. गेल्या निवडणूकी पेक्षा अधिक जागांचा अंदाज चाणक्यने व्यक्त केला आहे. तर यूपीए ७० जागांपर्यंत खाली येणार असल्याचे म्हटले आहे. तर यांनी देखील इतरांना ११३ जागा दिल्या आहेत.  

 

एकूण जागा ५४३      
सर्वेक्षण संस्था एनडीए यूपीए इतर
सी-वोटर २८७ १२८ १२७
जन की बात ३०५ १२४ ११३
चाणक्य ३४० ७० ११३
व्हीएमआर ३०६ १३२ १०४
न्यूज नेशन २९० ११८ १३०
सरासरी २९१ १२५ १२४

 

Lok sabha election 2019 Exit Poll: पाहा कोणत्या राज्यात कुणाच्या किती जागा येणार?

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
विविध वाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएकडे सत्ता  Description: लोकसभेच्या ७ व्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर देशातील सर्व वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल सादर केला. यात एनडीएला फायदा होताना दिसत आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles