महाराष्ट्राच्या 'पोल ऑफ पोल्स' मध्ये युतीला कमी फटका 

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 19, 2019 | 21:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघासाठी चार टप्प्यात निवडणुका झाल्या.  या निवडणुकीबाबत विविध वाहिन्यांनी सर्वेक्षण संस्थांच्या मदतीने एक्झिट पोल सादर केले. 

ALL EXIT POLL MAHARASHTRA
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघातील सर्व वाहिन्यांचा एक्झिट पोल  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई :  महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघासाठी देशातील विविध वाहिन्यांनी एक्झिट पोल सर्वे केला. त्यानुसार भाजप सेना युतीला गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत कमी जागा मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे. पण हा फटका केवळ ५ ते ६ जागांचाच असल्याचे एकूण सर्वांची सरासरी काढल्यावर दिसून येत आहे. 

महाराष्ट्राच्या पोल ऑफ पोल्सचा विचार केला असता  भाजप सेना युतीला सर्व वाहिन्यांच्या सरासरीचा विचार केला तर   ३६ जागा मिळण्याची शक्यता आहे. ही गेल्या वेळा ४२ जागांपेक्षा सहा जागांनी कमी असल्याचे दिसून येत आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यंदा सरासरी १२ जागा मिळू शकतात, त्यामुळे गेल्या वेळच्या ६ जागेवरून ६ जागांचा फायदा होताना दिसत आहे. 

सर्व वाहिन्यांनी महाराष्ट्राचा वर्तविलेला अंदाज

  1. एकूण सर्वांचा स्वतंत्रपणे विचार केला असता असे दिसते की एपीबी माझाने  युतीला ३४ जागा दिल्या आहेत. तर आघाडीला १४ जागा दिल्या आहे. 
  2. ईपसॉसने युतीला गेल्या वेळप्रमाणे ४२ ते ४५ जागा दिल्या आहेत. तर आघाडीवर गेल्या वेळचीच स्थिती येणार आहे. त्यांना ४ ते ६ जागा मिळू शकतात असे त्यांचा अंदाज आहे. 
  3. सी वोटरने दिलेल्या आकडेवारीनुसार युतीला ३४ जागा मिळू शकता तर आघाडीला १४ जागांवर समाधान मानावे लागेल. 
  4. इंडिया टु़डेनुसार युतीला ३८ ते ४२ जागांच्या आसपास जागा मिळू शकतात. तर आघाडी ६ ते १० जागांवर विजय मिळू शकतो. 
  5. सकाळने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात युतीला २९ जागा तर आघाडील १९ जागा यात मित्रपक्षांच्या ३ जागांचा समावेश आहे.
  6. जन की बातने केलेल्या सर्वेक्षणात युतीला ३४ ते ३९ आणि आघाडील ८ ते १२ आणि इतरांना १ जागा दिली आहे. 

 

एकूण ४८ जागा युती आघाडी इतर
टाइम्स नाऊ ३८ १० ००
एबीपी माझा ३४ १४ ००
न्यूज १८ ४२-४५ ४-६ ००
टीव्ही ९ ३४ १४ ००
इंडिया टुडे ३८-४२ ६-१० ००
सकाळ २९ १९ ००
आर.भारत ३४-३९ ८-१२
न्यूज २४ ३८ १० ००
       
सरासरी ३५-३६ १० ००

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
महाराष्ट्राच्या 'पोल ऑफ पोल्स' मध्ये युतीला कमी फटका  Description: महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघासाठी चार टप्प्यात निवडणुका झाल्या.  या निवडणुकीबाबत विविध वाहिन्यांनी सर्वेक्षण संस्थांच्या मदतीने एक्झिट पोल सादर केले. 
Loading...
Loading...
Loading...