LIVE गडचिरोली चिमूर लोकसभा निवडणूक २०१९ :  भाजपचे अशोक नेते दुसऱ्यांदा खासदार

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 23, 2019 | 22:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

गडचिरोली चिमूर लोकसभा मतदार संघात भाजपने विद्यमान खासदार अशोक नेते यांची उमेदवारी कायम केली आहेत, तर काँग्रेसने माजी आमदार नामदेव उसेंडी यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरविले आहे. 

gadchiroli chimur loksabha election results 2019
गडचिरोली चिमूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

गडचिरोली :  गडचिरोली चिमूर मतदार संघ २००८ मध्ये तयार झाला आहे. यात आतापर्यंत काँग्रेसने एकदा आणि भाजपने एकदा बाजी मारली आहे.  गेल्या निवडणुकीत भाजपच्या अशोक नेते यांनी २ लाख ३६ हजार मतांनी विजय मिळवला होता. त्यांनी काँग्रेसच्या नामदेव उसेंडी यांचा पराभव केला होता. यावेळी मैदानात एकूण ११ उमेदवार होते. त्यात अशोक नेते यांना ५ लाख ३५ हजार मते पडली होती तर नामदेव उसेंडी यांना २ लाख ९९ हजार मते पडली होती.  यात  निवडणुकीत बसप, आप आणि सीपीआय यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. तिघांना मिळून साधारण  १ लाख ३३ हजार मते मिळाली होती. तसेच विशेष उल्लेखनिय बाब म्हणजे नोटाला २४ हजार मते पडली होती.  यंदा मुख्य लढत ही काँग्रेस भाजपमध्ये असल्याने परिस्थिती बदलू शकते. 

LIVE UPDATES

 1. अशोक नेते, भाजप 65989 मतांनी आघाडीवर
 2. अशोक नेते, भाजप 56236 मतांनी आघाडीवर 
 3. अशोक नेते, भाजप 41684 मतांनी आघाडीवर
 4. अशोक नेते, भाजप 36139 मतांनी आघाडीवर
 5. गडचिरोली - अशोक नेते, भाजप १७१४३ मतांनी आघाडीवर
 6. गडचिरोली -चिमूर (आघाडी) १ फेरी
  अशोक नेते (भाजप)-25,814
  डाँ.नामदेव उसेंडी- (काँग्रेस )-17,008
  रमेश गजबे(वंचित बहुजन आघाडी)-7,234
  अशोक नेते-8,808 मतांची आघाडी.
 7. ईव्हीएम मतमोजणीला सुरूवात
 8. टपाल मतमोजणीला सुरूवात
 9. थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

टाइम्स नाऊ मराठीचा ग्राऊंड 'सेंटी'मीटर रिपोर्ट

गडचिरोली लोकसभा मतदार संघात यंदा अत्यंत टफ फाइट पाहायला मिळणार आहे. यंदा निवडणुकीत सर्वात कमी उमेदवारांमध्ये फाइट असल्याने निवडणूक रंगतदार झाली आहे. भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांच्या विरूद्ध भाजपमध्येच नाराजी आहे. त्यामुळे त्यांना जरा ही निवडणूक अवघड गेली आहे. तसेच सरकार विरोधातील नाराजी यामुळे अँन्टीइकम्बसीचा फटका काही प्रमाणात अशोक नेते यांना बसू शकतो. मोदी लाटेत ही जागा मोठ्या फरकाने निवडून आणण्यात नेते यांना यश आले, पण सध्या परिस्थिती बदलली असून म्हणावी तशी लाट या भागात दिसली नाही. 

दुसरे असे की आप, बसप, सीपीआय आणि नोटा मध्ये झालेले मत विभाजन कोणाच्या बाजूने जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  नामदेव उसेंडी यांचा विचार केला तर काँग्रेसमध्येही काही प्रमाणात अंतर्गत वाद सुरू होते.  काँग्रेस कार्यकर्ते किती सक्रिय आहेत यावरच उसेंडी यांच्या बाजूने मतांची टक्केवारी वाढण्यात मदत होणार आहे. विधानसभा मतदार संघाचा विचार करता या जिल्ह्यात केवळ विजय वड्डेटीवार हे एकमेव काँग्रेस आमदार आहेत. त्यामुळे या ठिकाणी जोर लागू शकतो. पण एकूण गणित दोन्ही पक्षातील  अंतर्गत बंडाळीला कोण योग्य प्रकारे क्षमवू शकले आहेत, यावर जुळून येणार आहे.

(टाइम्स नाऊ मराठीने वरील लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. त्यानुसार हा अंदाज वर्तविण्याचा प्रयत्न आहे. ) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
LIVE गडचिरोली चिमूर लोकसभा निवडणूक २०१९ :  भाजपचे अशोक नेते दुसऱ्यांदा खासदार Description: गडचिरोली चिमूर लोकसभा मतदार संघात भाजपने विद्यमान खासदार अशोक नेते यांची उमेदवारी कायम केली आहेत, तर काँग्रेसने माजी आमदार नामदेव उसेंडी यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरविले आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola