माजी क्रिकेटर गौतम गंभीरला भाजपकडून पूर्व दिल्लीतून तिकीट

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 23, 2019 | 00:02 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

गौतम गंभीर कोणत्या मतदारसंघातून  निवडणूक लढवणार यावरून भाजपने पडदा उचलला आहे. भारतीय जनता पक्षाने त्याला पूर्व दिल्लीतून लोकसभा मतदारसंघाचे तिकीट दिले आहे. 

gautam gambhir
गौतम गंभीर  |  फोटो सौजन्य: ANI

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला पूर्व दिल्ली येथून उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये गौतम गंभीरच्या नावाचा समावेश आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता गौतम गंभीर कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबत अनेक शक्यतांवर चर्चा सुरू होत्या. गौतम गंभीरशिवाय मीनाक्षी लेखी यांच्या तिकीटाबाबतही घोषणा करण्यात आली आहे. सोमवारी भाजपकडून पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत सध्याचे भाजपचे खासदार महेश गिरी यांचे तिकीट कापण्यात आले आहे.

 

 


काही दिवसांपूर्वीच गौतम गंभीरने भाजपने प्रवेश केला. त्याच्या प्रवेशापूर्वी गौतम गंभीर राजकारणात प्रवेश करणार असल्याचा चर्चा रंगल्या होत्या.  काही दिवसांपूर्वी भाजपचे तिकीट मिळण्याबाबतच्या चर्चेवर म्हटले होते, संपूर्ण आयुष्यात मी क्रिकेट खेळत आलोय. मी असं ऐकलंय की पूर्णवेळ राजकारण माणसाला बदलून टाकते. माझ्या दोन लहान लहान मुली आहेत मला त्यांच्यासोबत वेळ घालवायचा आहे. मी ही या चर्चा ऐकल्या आहेत. मात्र सध्या मी आयपीएलमध्ये स्टार स्पोर्ट्सवर कमेंट्री करणार आहे. 

वर्ल्डकपमध्ये महत्त्वाची भूमिका 

२०११च्या वर्ल्डकपमध्ये गौतम गंभीरने विजयी भूमिका साकारली होती. त्याने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ९७ धावांची खेळी करताना संघाला विजय मिळवून देण्यात मोठे योगदान दिले होते. 

क्रिकेट कारकीर्द

गौतम गंभीरच्या क्रिकेट कारकिर्दीबाबत बोलायचे झाल्यास त्याने भारताला अनेक चांगल्या खेळी करून दिल्या. त्याने ५८ कसोटी सामन्यांत ४१.९६च्या सरासरीने ४१५४ धावा केल्या आहेत. यात त्याने ९ शतके ठोकली.त्याने १४७ वनडे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. यात त्याने ३९.६८च्या सरासरीने आणि ११ शतकांच्या मदतीने ५२३८ धावा केल्या आहेत. तर गंभीर ३७ टी-२० भारताकडून खेळला आहे. यात त्याने ९२२ धावा करताना ७ अर्धशतके ठोकली. 
 

 

आयपीएलमध्ये कोलकाताच्या नावावर विजेतेपद

आयपीएलमध्येही गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघाने दोन वेळा जेतेपद पटकावले होते. २०१२ आणि २०१४मध्ये त्यांनी जेतेपद मिळवले होते. 

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
माजी क्रिकेटर गौतम गंभीरला भाजपकडून पूर्व दिल्लीतून तिकीट Description: गौतम गंभीर कोणत्या मतदारसंघातून  निवडणूक लढवणार यावरून भाजपने पडदा उचलला आहे. भारतीय जनता पक्षाने त्याला पूर्व दिल्लीतून लोकसभा मतदारसंघाचे तिकीट दिले आहे. 
Loading...
Loading...
Loading...