VIDEO: स्टेजवर चढून हार्दिक पटेलांच्या कानाखाली मारली, प्रचारसभेत मोठा गोंधळ

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 19, 2019 | 13:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

VIDEO: गुजरातमधील काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना एका व्यक्तीने भर सभेत कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील सुरेंद्रनगरमध्ये घडली आहे. 

Hardik patel slam_ani
VIDEO: हार्दिक पटेलांना कोणी मारली कानाखाली?  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • गुजरातमध्ये पाटीदार समाजाचं नेतृत्व हार्दिक पटेलांनी केलं होतं
  • काही दिवसांपूर्वीच हार्दिक पटेलांनी काँग्रेसमध्ये केला होता प्रवेश
  • हार्दिक पटेलांच्या श्रीमुखात भडकवल्यानंतर कार्यकर्त्यांकडून हल्लोखोराला बेदम मारहाण

अहमदाबाद: गुजरातमधील पाटीदार नेते आणि काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या हार्दिक पटेल यांना भर सभेत एका व्यक्तीने कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका सभेत बोलत असताना एका व्यक्तीने थेट व्यासपीठावर येत हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे भडकलेल्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीवर झडप घालून त्याला बराच चोप दिला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना गुजरातच्या सुरेंद्रनगर येथे घडली. सुरेंद्रनगरमधील बलदाणा गावामध्ये हार्दिक हे एका निवडणूक प्रचार सभेत बोलत होते. त्याचवेळी एका व्यक्तीने मंचावर चढून हार्दिक पटेल यांच्यावर हल्ला केला. 

या घटनेनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्याने त्या व्यक्तीला पकडून त्याला तुफान मारहाण केली. यामुळे व्यासपीठावर एकच गर्दी झाली होती. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करुन त्या व्यक्तीला गर्दीतून बाहेर काढलं. या मारहाणीत संबंधित व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या या व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. 

या मारहाणीच्या घटनेनंतर हार्दिक पटेल यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली. यावेळी ते असं म्हणाले की, 'भाजपवाल्यांना असं वाटतं की, माझा जीव घेण्यात यावा. ती लोकंच हे हल्ले करत आहेत, पण आता आम्ही अजिबात गप्प बसणार नाही.' असं हार्दिक पटेल यावेळी म्हणाले. दुसरीकडे हार्दिक पटेल यांच्यावर हल्ला केलेल्या व्यक्तीबाबत अद्याप फारशी माहिती मिळू शकलेली नाही. तसंच या व्यक्तीने हार्दिक पटेल यांच्यावर हल्ला का केला? याचं नेमकं कारणही समजू शकलेलं नाही. सध्या गुजरात पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.  

हार्दिक पटेलांच्या श्रीमुखात भडकावली:

दरम्यान, ही काही पहिली घटना नाही. कारण की, कालच (गुरुवार) भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार जीव्हीएल नरसिम्हा यांच्यावर एका व्यक्तीने चप्पल फेकली होती. 

भाजप खासदारावर चप्पल फेकणारा व्यक्तीचं नाव शक्ती भार्गव असं असून सध्या त्याच्यामागे आयकर खात्याचा ससेमिरा लागला आहे. संपत्ती खरेदी, अज्ञात आणि अघोषित उत्पन्न प्रकरणी आयकर खात्याकडून त्याची चौकशी सुरू आहे. भाजप मुख्यालयात गुरुवारी नरसिम्हा हे पत्रकार परिषदेत बोलत असताना अचानक शक्ती भार्गवने त्यांच्या दिशेने चप्पल फेकून मारली. 

दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना देखील अशा प्रकारच्या जनक्षोभाला अनेकदा सामोरं जावं लागलं आहे. कारण केजरीवाल यांच्यावर जाहीर सभेत अनकेदा असे हल्ले करण्यात आले आले आहेत.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
VIDEO: स्टेजवर चढून हार्दिक पटेलांच्या कानाखाली मारली, प्रचारसभेत मोठा गोंधळ Description: VIDEO: गुजरातमधील काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना एका व्यक्तीने भर सभेत कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील सुरेंद्रनगरमध्ये घडली आहे. 
Loading...
Loading...
Loading...