हिंगोली लोकसभा निवडणूक २०१९  :  आजी माजी शिवसैनिकात टफ फाईट

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 22, 2019 | 17:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

हिंगोली लोकसभा मतदार संघात यंदा काँग्रेसने विद्यमान खासदार राजीव सातव यांच्या ऐवजी सुभाष वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. तर नांदेडमधून हिंगोलीत आलेल्या हेमंत पाटील यांनी शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. 

hingoli election results 2019
हिंगोली लोकसभा निवडणूक निकाल २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

हिंगोली :  हिंगोली मतदार संघात गेल्या निवडणूकीत मोदी लाटेतही काँग्रेसच्या राजीव सातव यांनी आपली 'नाव' थोडक्यात किनाऱ्यावर लावली होती. सर्वात कमी मताधिक्याने त्यांनी सुभाष वानखेडे यांचा पराभव केला होता. सध्या सुभाष वानखेडे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. यावेळी सातव यांनी केवळ १६२९ मतांनी वानखेडेचे आव्हान परतवले होते. सातव यांना एकूण ४ लाख ६७ हजार मते पडली होती तर वानखेडे यांना ४ लाख ६५ हजार मते पडली होती. बसपा आणि सीपीआय ने अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची मते पडली होती.  पण यंदा परिस्थिती वेगळी आहे. हिंगोलीतील राजकारण आणि मतांचे गणित बदलले आहे. 

टाइम्स नाऊ मराठीचा ग्राऊंड 'सेंटी'मीटर रिपोर्ट

गेल्या निवडणुकीत मोदी लाटेत महाराष्ट्रातून काँग्रेसच्या फक्त दोन जागा आल्या होत्या. त्यातील हिंगोलीची जागा राजीव सातव यांनी जिंकली होती. ती पण कमी मार्जिनने, पण यंदाच्या निवडणुकीत राजीव सातव यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा दर्शवली नाही. त्यांनी यावेळी ज्यांना पराभूत केले होते. त्या शिवसेनेतून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या सुभाष वानखेडे यांना उमेदवारीसाठी प्रयत्न केले आहेत.  वानखेडे यांचा स्वतःची संपर्क यंत्रणा आहे. तसेच काँग्रेसचे बळ त्यांना मिळाले आहे. त्यामुळे यंदा वानखेडे यांचे पारडं जड वाटतं आहे. मराठवाड्यातील दुष्काळ हातळण्यात सरकारला आलेले अपयश आणि बेरोजगारीचा प्रश्न यामुळे शिवसेनेला त्यांचा फटका पडू शकतो. 

एकूण ही निवडणूक आजी शिवसैनिक आणि माजी शिवसैनिक यांच्यात होत असून त्यांच्यात कोणता शिवसैनिक निवडून येतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राजीव सातव यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक लढवली नसल्याचे सांगण्यात येत आहे. सातव राहुल गांधी यांच्या खास विश्वासातले सहकारी आहेत. 

(टाइम्स नाऊ मराठीने वरील लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. त्यानुसार हा अंदाज वर्तविण्याचा प्रयत्न आहे. ) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
हिंगोली लोकसभा निवडणूक २०१९  :  आजी माजी शिवसैनिकात टफ फाईट Description: हिंगोली लोकसभा मतदार संघात यंदा काँग्रेसने विद्यमान खासदार राजीव सातव यांच्या ऐवजी सुभाष वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. तर नांदेडमधून हिंगोलीत आलेल्या हेमंत पाटील यांनी शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. 
Loading...
Loading...
Loading...