लातूर लोकसभा निवडणूक २०१९  :  विलासरावांचा 'गड' पुन्हा काँग्रेसकडे येणार? 

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 22, 2019 | 18:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

लातूर लोकसभा मतदार संघात यंदा भाजकडून सुधाकर श्रृंगारे आणि काँग्रेसकडून मच्छिंद्र कामत निवडणुकीच्या मैदानात आहेत. 

latur loksabha election results 2019
लातूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

लातूर :  काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जिल्हा म्हणून या मतदार संघाकडे पाहिले जाते. पण विलासराव गेल्यानंतर गेल्या निवडणुकीत भाजपने या ठिकाणी खाते खोलून काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले.  भाजपच्या सुनील गायकवाड यांनी काँग्रेसच्या दत्तात्रय बनसोडे यांच्यावर पावणे तीन लाख मतांनी पराभव केला. पण यंदा भाजपने गायकवाड यांचा पत्ता कट करून सुधाकर श्रृंगारे यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसनेही आपला उमेदवार बदलून मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी दिली. 

टाइम्स नाऊ मराठीचा ग्राऊंड 'सेंटी'मीटर रिपोर्ट

लातूर लोकसभा मतदार संघात काँग्रेस आणि भाजप अशी थेट लढत आहे. त्यातील दोन्ही उमेदवार पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. पण खरा सामना हा भाजपचे मंत्री संभाजीराव निलंगेकर आणि काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख यांच्यात मानला जात आहे.  अमित देशमुख यांच्या मदतीला अभिनेता रितेश देशमुखही लातूर मतदार संघात अनेक ठिकाणी भाषणे ठोकताना दिसला. पण या मतदार संघात सत्ता आपल्या हातात असल्याने मतदारांपर्यंत पोहचलेल्या निलंगेकरांचा जोर जास्त दिसत आहे. त्यांनी ही लढाई प्रतिष्ठेची केली आहे. विलासराव देशमुख गेल्यानंतर ही दुसरी लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला दिलेली प्रतिष्ठा पुन्हा परत मिळविण्यासाठी अमित देशमुख प्रयत्नशील आहे. तसेच काँग्रेसमधील आपले वजन वाढविण्यासाठी त्यांच्यासाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची मानली जाते. 

या मतदार संघात  राज ठाकरे फॅक्टरचा फायदा काँग्रेसच्या उमेदवारला होताना दिसत आहे. पण गेल्या वेळचा साधारण पावणे तीन लाखांचा लीड तोडणे अवघड असल्याने भाजपाचा विजय निश्चित मानला जात आहे. पण तो कमी मतांनी होईल अशी शक्यता आहे. 

(टाइम्स नाऊ मराठीने वरील लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. त्यानुसार हा अंदाज वर्तविण्याचा प्रयत्न आहे. ) 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
लातूर लोकसभा निवडणूक २०१९  :  विलासरावांचा 'गड' पुन्हा काँग्रेसकडे येणार?  Description: लातूर लोकसभा मतदार संघात यंदा भाजकडून सुधाकर श्रृंगारे आणि काँग्रेसकडून मच्छिंद्र कामत निवडणुकीच्या मैदानात आहेत. 
Loading...
Loading...
Loading...