पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल, वाराणसीत जोरदार शक्तीप्रदर्शन

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 26, 2019 | 14:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pm Modi Varanasi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतून आपला निवडणूक अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, काल त्यांनी वाराणसीतून रोड शो द्वारे जोरदार शक्तीप्रदर्शनही केलं होतं.

pm modi_twitter
वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी LIVE (@BJP4India)   |  फोटो सौजन्य: Twitter

वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ नंतर आज दुसऱ्यांदा वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यापूर्वी मोदींना एनडीएमधील घटक पक्षांचे नेते आण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी मोदींनी जदयूचे प्रमुख नीतीश कुमार, अकाली दलाचे प्रमुख प्रकाश सिंह बादल, यांच्याशीही चर्चा केली. यावेळेस पंतप्रधान मोदींनी प्रकाश सिंह बादल यांना नमस्कार करून आशीर्वाद देखील घेतले. याआधी पंतप्रधान मोदींनी बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांना देखील संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले की, 'सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. काल मी जे दृश्य पाहिलं त्यावरुन मला तुमच्या परिश्रमांची जाणीव झाली. सरकार बनवणं हे जनतेचं काम आहे आणि सरकार चालवणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे ही जबाबदारी मी संपूर्ण इमानदारीने निभावली आहे.' 

पंतप्रधान मोदींनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एनडीएमधील घटक पक्षांच्या प्रमुखांशी बातचीतही केली. यावेळी खुद्द भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घटक पक्षाच्या नेत्यांची बडदास्त ठेवली होती. इथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाश सिंह बादल, जदयूचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, लोजपचे प्रमुख रामविलास पासवान, अनुप्रिया पटेल, तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री पन्नीरसेल्वम, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, सुषमा स्वराज यांच्यासारखे अनेक नेते उपस्थित होते. 

दरम्यान, मोदींनी कालपासूनच वाराणसीत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं. सुरुवातीला बनारस हिंदू विश्वविद्यालयचे संस्थापक पं. मदन मोहन मालवीय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांनी सात किलोमीटर लांब रोड शो केला. यावेळी पंतप्रधान मोदींनी भगव्या रंगांचा कुर्ता परिधान केला होता. यावेळी मोदींनी वाराणसीतील जनतेचे आभारही मानले. मोदींचा हा रोड शो दशाश्वमेध घाटावर संपला. त्यानंतर मोदींनी गंगा आरतीही केली. त्यावेळेस त्यांच्यासोबत अमित शहा हे देखील उपस्थित होते. 

 

 

पंतप्रधान मोदींचा अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे वाराणसीत दाखल

LIVE पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्ज भरण्यासाठी रवाना:

लाईव्ह अपडेट:

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी काळभैरव मंदिरात 
 2. काळभैरव मंदिरात पंतप्रधान मोदींकडून पूजा-अर्चा 
 3. मोदींच्या निवडणूक अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे आणि प्रकाशसिंह बादल हे देखील वाराणसीत दाखल 
 4. नरेंद्र मोदी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना
 5. मोदींची एक झलक पाहण्यासाठी वाराणसीच्या रस्त्यांवर दुर्तफा प्रचंड गर्दी 
 6. एनडीएचे सगळे महत्त्वाचे नेते हे वाराणसीत दाखल 
 7. भाजप अध्यक्ष अमित शहा हे देखील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल 
 8. पंतप्रधान मोदींनी सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची घेतली भेट
 9. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांना नमस्कार करुन घेतले आशीर्वाद
 10.  पंतप्रधान मोदी आपला उमदेवारी अर्ज घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले
 11.  जिल्हाधिकाऱ्यांनी मोदींचा उमेदवारी अर्ज स्वीकारला
 12. पंतप्रधान मोदींनी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलं 
 13. सुभाष गुप्ता हे नरेंद्र मोदींचे अनुमोदक 
 14. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्ज भरल्यानंतर पुन्हा घटक पक्षांच्या नेत्यांची घेतली भेट

पंतप्रधान मोदींनी सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन काही वेळ चर्चा केली. 


#पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल, वाराणसीत जोरदार शक्तीप्रदर्शन Description: Pm Modi Varanasi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतून आपला निवडणूक अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, काल त्यांनी वाराणसीतून रोड शो द्वारे जोरदार शक्तीप्रदर्शनही केलं होतं.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola