#Live Lok Sabha elections 2019: सायंकाळी पाचपर्यंत ५७.०१ टक्के मतदान

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 23, 2019 | 21:27 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक २०१९ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. जळगाव, सातारा, अहमदनगर यासारख्या जागांवर मतदान केंद्रावर सकाळपासून लोकांच्या रांगा लागल्या होत्या.

pawar family
महाराष्ट्रात १४ जागांवर मतदान सुरू  |  फोटो सौजन्य: AFP

मुंबई: लोकसभा निवडणूक २०१९ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली होती. तिसऱ्या टप्प्यात देशाच्या १३ राज्यामध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यात दोन केंद्रशासित प्रदेशातील ११७ मतदारसंघात मतदान पार पडलं. यात महाराष्ट्रातल्या १४ मतदारसंघाचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात गिरीश बापट, सुजय विखे-पाटील, सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, सुनील तटकरे, राजू शेट्टी, चंद्रकात खैरे या दिग्गजांचं भविष्य आज मतदानपेटीत बंद होईल. तर या टप्प्यात सर्वांत गाजलेला मतदारसंघ माढा तसंच जळगाव, जालना, रावेर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, इथेही दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील १४ जागांवर मतदान झालं आहे. यापैकी अनेक जागा या पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसने येथील प्रत्येक मतदारसंघात जोरदार प्रचार केला असून प. महाराष्ट्रातील अनेक जागा कायम राखण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.  

Lok Sabha Elections 2019: पाहा महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात उमेदवारांमध्ये होणाऱ्या लढती

देशात ६३.२४ टक्के मतदान

देशाच्या १३ राज्यामध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडली. यात ११७ मतदारसंघात हा मतदान झाले. संपूर्ण देशभरात ६३.२४ टक्के मतदान झाले. यात आसाममध्ये ७८.२९ टक्के, बिहारमध्ये ५९.९७ टक्के, गोव्यामध्ये ७१.०९ टक्के, गुजरात ६०.२१ टक्के, जम्मू-काश्मीरमध्ये १२.८६ टक्के, कर्नाटक मध्ये ६४.१४ टक्के, केरळमध्ये ७०.२१ टक्के, महाराष्ट्रात ५६.५७ टक्के मतदान झाले आहे. 

सायंकाळी ५ वाजेर्यंत कुठल्या मतदारसंघात किती टक्के मतदान?

५ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी, राज्यातील १४ जागांवर ५७.०१ टक्के मतदान 

 1. जळगाव - ५२.२८ टक्के 
 2. रावेर - ५६.९८ टक्के 
 3. जालना - ५९.९२ टक्के 
 4. औरंगाबाद - ५८.५२ टक्के 
 5. रायगड - ५६.१४ टक्के 
 6. पुणे - ४३.६३ टक्के
 7. बारामती - ५५.८४ टक्के 
 8. अहमदनगर - ५७.७५ टक्के 
 9. माढा - ५६.४१ टक्के 
 10. सांगली - ५९.३९ टक्के 
 11. सातारा - ५५.४० टक्के 
 12. रत्नागिरी -सिंधुदुर्ग - ५७.६३ टक्के 
 13. कोल्हापूर - ६५.७० टक्के 
 14. हातकणंगले - ६४.७९ टक्के 

 

३ वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

तिसऱ्या टप्प्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४६.२८ टक्के मतदान 

 1. बारामतीमध्ये ३ वाजेपर्यंत ४५.३५ टक्के मतदान
 2. औरंगाबादमध्ये ३ वाजेपर्यंत ४७.३६ टक्के मतदान
 3. रावेरमध्ये ३ वाजेपर्यंत ४६.०४ टक्के मतदान
 4. जळगावमध्ये ३ वाजेपर्यंत ४२.६२ टक्के मतदान
 5. सांगलीत ३ वाजेपर्यंत ४६.६४ टक्के मतदान
 6. कोल्हापुरात ३ वाजेपर्यंत ५४.२४ टक्के मतदान
 7. पुण्यात ३ वाजेपर्यंत ३६.२९ टक्के मतदान
 8. अहमदनगरमध्ये ३ वाजेपर्यंत ४५.६५ टक्के मतदान 
 9. माढ्यात ३ वाजेपर्यंत ४४.१३ टक्के मतदान
 10. जालनामध्ये ३ वाजेपर्यंत ४९.४० टक्के मतदान 
 11. साताऱ्यात ३ वाजेपर्यंत ४४.७७ टक्के मतदान
 12. रायगडमध्ये ३ वाजेपर्यंत ४७.९७ टक्के मतदान
 13. हातकणंगलेमध्ये ३ वाजेपर्यंत ५२.२७ टक्के मतदान
 14. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ३ वाजेपर्यंत ४७.१७ टक्के मतदान

दुपारी एक वाजेपर्यंत महाराष्ट्रातील १४ जागांवर ३२.३६ टक्के मतदान

११ वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

तिसऱ्या टप्प्यात सकाळी ११ वाजेपर्यंत २१.३८ टक्के मतदान 

 1. बारामतीमध्ये ११ वाजेपर्यंत २१.३३ टक्के मतदान
 2. औरंगाबादमध्ये ११ वाजेपर्यंत २०.९७ टक्के मतदान
 3. रावेरमध्ये ११ वाजेपर्यंत २१.१४ टक्के मतदान
 4. जळगावमध्ये ११ वाजेपर्यंत २०.३४ टक्के मतदान
 5. सांगलीत ११ वाजेपर्यंत २०.०९ टक्के मतदान
 6. कोल्हापुरात सकाळी ११ वाजेपर्यंत २५.४९ टक्के मतदान
 7. पुण्यात ११ वाजेपर्यंत १५.५० टक्के मतदान
 8. अहमदनगरमध्ये ११ वाजेपर्यंत २०.२६ टक्के मतदान 
 9. माढ्यात ११ वाजेपर्यंत १९.६३ टक्के मतदान
 10. जालनामध्ये ११ वाजेपर्यंत २३.२८ टक्के मतदान 
 11. साताऱ्यात ११ वाजेपर्यंत २८.६७ टक्के मतदान
 12. रायगडमध्ये ११ वाजेपर्यंत २३.९४ टक्के मतदान
 13. हातकणंगलेमध्ये ११ वाजेपर्यंत २३.४५ टक्के मतदान
 14. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ११ वाजेपर्यंत २४.९६ टक्के मतदान

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धीमध्ये मतदान केलं. महाराष्ट्रातील १४ जागांवर आज मतदान सुरू आहे. 

सकाळी ९ वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

 1. कोल्हापुरात सकाळी ९ वाजेपर्यंत ८.७० टक्के मतदान
 2. पुण्यात ९ वाजेपर्यंत ८.७१ टक्के मतदान
 3. औरंगाबादमध्ये ९ वाजेपर्यंत ८.२० टक्के मतदान
 4. अहमदनगरमध्ये ९ वाजेपर्यंत ३.९७ टक्के मतदान 
 5. माढ्यात ९ वाजेपर्यंत ६.५२ टक्के मतदान
 6. बारामतीमध्ये ९ वाजेपर्यंत ६.१ टक्के मतदान
 7. सांगलीत ९ वाजेपर्यंत ६.६९ टक्के मतदान
 8. जळगावमध्ये ९ वाजेपर्यंत ७.०४ टक्के मतदान
 9. जालनामध्ये ९ वाजेपर्यंत ९.२३ टक्के मतदान 
 10. रावेरमध्ये ९ वाजेपर्यंत ७.१९ टक्के मतदान
 11. साताऱ्यात ९ वाजेपर्यंत ६.८१ टक्के मतदान
 12. रायगडमध्ये ९ वाजेपर्यंत ७.१७ टक्के मतदान
 13. हातकणंगलेमध्ये ९ वाजेपर्यंत ७.०६ टक्के मतदान
 14. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ९ वाजेपर्यंत ३.४६ टक्के मतदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये मतदान केल्यानंतर मीडियाशी बातचीत केली. 'कुंभमेळ्यातील स्नानामध्ये जो आनंद आहे तोच आनंद लोकशाहीत मतदान करण्यात आहे. त्यामुळे मतदान जरूर करा आणि निर्णायक सरकार बनवण्यात मदत करा. आपण १०० टक्के मतदान करावं. मतदान देऊन लोकशाहीत सहभागी व्हा.'

बारामती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत मतदान केलं.

१४ जागांवर होणार मतदान 

 1. पुणे 
 2. औरंगाबाद
 3. अहमदनगर 
 4. जळगाव
 5. जालना 
 6. रावेर 
 7. सातारा
 8. सांगली 
 9. रायगड
 10.  माढा
 11.  बारामती
 12.  हातकणंगले 
 13.  रत्नागिरी-सिंधुदुर्ग
 14.  कोल्हापूर

आज या राज्यांमध्ये मतदान 

 1.  गुजरातः २६ मतदारसंघ 
 2.  केरळः २० मतदारसंघ
 3.  कर्नाटकः १४ मतदारसंघ
 4.  उत्तर प्रदेशः १० मतदारसंघ 
 5.  छत्तीसगडः ७ मतदारसंघ 
 6.  ओडिशाः ५ मतदारसंघ
 7.  बिहारः ५ मतदारसंघ 
 8.  पश्चिम बंगालः ५ मतदारसंघ 
 9.  आसामः ४ मतदारसंघ
 10.  गोवाः २ मतदारसंघ 
 11.  जम्मू काश्मिरः १ मतदारसंघ
 12.  दादरा व नगरहवेलीः १ मतदारसंघ
 13.  दमण आणि दीवः १ मतदारसंघ
 14.  त्रिपुराः १ मतदारसंघ
लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
#Live Lok Sabha elections 2019: सायंकाळी पाचपर्यंत ५७.०१ टक्के मतदान Description: Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक २०१९ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. जळगाव, सातारा, अहमदनगर यासारख्या जागांवर मतदान केंद्रावर सकाळपासून लोकांच्या रांगा लागल्या होत्या.
Loading...
Loading...
Loading...