चार तासांनंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपली, राहुल गांधींचा राजीनामा नाही

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 25, 2019 | 15:36 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाचा दणदणीत पराभव झाला. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक सध्या नवी दिल्लीमध्ये सुरू आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावरून संभ्रम अद्यापही कायम आहे. 

CWC meeting
चार तासांनंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपली, राहुल गांधींचा राजीनामा नाही  |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली:  भाजपनं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर काँग्रेस पक्षाचं प्रदर्शन खूपच वाईट झालं. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस दणदणीत पराभव झाला. काँग्रेस पक्षाला ५४२ जागांपैकी केवळ ५२ जागांवर विजय मिळवता आला. त्यानंतर काँग्रेस पक्षानं आज कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे. गेल्या तीन तासांपासून ही बैठक सुरू आहे. बैठकीपूर्वी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. 

या बैठकीत राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्विकारून अध्यक्षपदाचा राजीनामा कार्यकारिणीची सदस्यांसमोर सादर केल्याची माहिती समोर आली आहे. 

CWC बैठकीतील लाईव्ह अपडेट्स 

 1. या बैठकीत लोकसभेत काँग्रेसचा पराभव यावर चर्चा झाली आणि कारणांची समीक्षा केली गेली.
 2. सीडब्ल्यूसी बैठक संपली आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही.
 3. राहुल गांधींच्या भाषणाला सुरूवात
 4. लोकसभा निवडणुकीत पराभूत होण्याच्या कारणास्तव चर्चा सुरू आहे.
 5. सुरजेवाला म्हणाले की, राहुल गांधी बैठकीच्या शेवटी भाषण करतील
 6. सुरजेवाला म्हणाले - राहुल गांधी अद्याप सीडब्ल्यूसीच्या बैठकीत बोललेच नाही आहेत.
 7. सुरजेवाला म्हणाले की राहुल गांधी यांनी राजीनामा सादर केला नाही आहे.
 8. कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांचं बैठकीवर उत्तर
 9. राहुल गांधींच्या समर्थनात संजय निरूपम म्हणाले की, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आम्ही साहसीपणे लढलो.
 10. पूर्ण CWC मध्ये म्हटलं की, राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये.
 11. राहुल गांधी यांच्या कार्यालयात काम करणारे लोक डाव्यांसारखे काम करत आहेत. 
 12. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की, राहुल गांधी यांच्यासोबत भेट होत नाही.
 13. राहुल गांधींच्या कार्यलयात काम करणाऱ्यांवर प्रश्न
 14. केवळ 5 वर्षे मोदींना आव्हान दिले आहे असे नेते म्हणाले
 15. केवळ राहुल गांधी यांनीच मोदींना आव्हान दिले आहे, असे काँग्रेस नेते बैठकीत म्हणाले.
 16. राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये, CWC नं बैठकीत म्हटलं
 17. त्याच वेळी राहुल गांधी नाहीतर मग कोण? असंही या बैठकीत म्हटले जात आहे.
 18. पराभूत होण्याची नैतिक जबाबदारी बोलून राहुल यांनी राजीनामा देण्याची विनंती केली.
 19. बैठकीत राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष म्हणून राजीनामा दिला.
 20. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ सीडब्ल्यूसीच्या बैठकीला गैरहजर
 21. सीडब्ल्यूसीची बैठक सुरू झाली आहे आणि लोकसभा निवडणुकीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जात आहे.
 22. सीडब्ल्यूसीची बैठक सुरू होणार आहे, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, गुलाम नबी आझाद बैठकीला हजर.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
चार तासांनंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपली, राहुल गांधींचा राजीनामा नाही Description: लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाचा दणदणीत पराभव झाला. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक सध्या नवी दिल्लीमध्ये सुरू आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावरून संभ्रम अद्यापही कायम आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles