Lok sabha election 2019 Exit Poll: एबीपी न्यूज-नेल्सन महाराष्ट्रात युतीच्या जागा कमी होणार?

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 19, 2019 | 20:54 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Lok Sabha 2019: देशातील राजकारणाच्या दृष्टीने सर्वांत मोठे राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशातील अंदाज जाहीर करण्यात आले आहेत. त्यात भाजपला समाजवादी पार्टी आणि बसपा महाआघाडीचा मोठा दणका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.

BJP will loose their seats in up
एबीपी नेल्सनचा एक्झिट पोल उत्तर प्रदेशात भाजपला फटका   |  फोटो सौजन्य: PTI

नवी दिल्ली : देशात आज, लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडला. त्याचबरोबर देशातील निवडणुकांचे एक्झीट पोल जाहीर झाले. यात वेगवेगळ्या मीडिया हाऊस आणि संस्थांनी त्यांच्या एक्झिट पोलच्या माध्यमातन निवडणुकांचा अंदाज व्यक्त केला. यात एबीपी न्यूज आणि नेल्सन यांनी संयुक्तपणे केलेल्या एक्झिट पोलनुसार आता देशभरातील आकडे समोर येऊ लागले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीला फटका बसत असल्याची शक्यता आहे. पण, भाजप आणि शिवसेना हेच पक्ष राज्याता आघाडीवर राहण्याची शक्यता या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. 

सुरुवातीला देशातील राजकारणाच्या दृष्टीने सर्वांत मोठे आणि महत्त्वाचे राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील अंदाज जाहीर करण्यात आले आहेत. त्यात भाजपला सपाटून मार खावा लागण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टी आणि मायवती यांच्या बसप महाआघाडीचा दणका भाजपला बसण्याची चिन्हे आहेत. तर, काँग्रेसच्या वाट्याला अमेठी आणि रायबरेलीच्या दोन जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील या राजकीय गणितावरच केंद्रातील सत्ता स्थापनेचं गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळं एबीपी न्यूज आणि नेल्सनं व्यक्त केलेल्या अंदाजातून भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एबीपी न्यूज आणि नेल्सन यांच्या एक्झिटपोलचे राज्य निहाय अंदाज असे

देशात काय होणार?

 1. भाजप (एनडीए) - २६७
 2. काँग्रेस (यूपीए) - १२७
 3. सपा-बसप – ५६
 4. इतर – ८४

उत्तर प्रदेश

 1. भाजप – २२
 2. सप-बसप – ५६
 3. काँग्रेस – २

महाराष्ट्र

 1. भाजप – १७
 2. शिवसेना – १७
 3. काँग्रेस - ४
 4. राष्ट्रवादी – ९
 5. इतर – १

गुजरात

 1. भाजप – २४
 2. काँग्रेस – २

मध्य प्रदेश

 1. भाजप – २४
 2. काँग्रेस – ५

राजस्थान

 1. भाजप (एनडीए) – १९
 2. काँग्रेस (यूपीए) – ६

बिहार

 1. भाजप (एनडीए) – ३४
 2. काँग्रेस (यूपीए) – ६

पश्चिम बंगाल

 1. भाजप (एनडीए) – १६
 2. काँग्रेस – २
 3. तृणमूल - २४

कर्नाटक

 1. भाजप – १५
 2. काँग्रेस – १३

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok sabha election 2019 Exit Poll: एबीपी न्यूज-नेल्सन महाराष्ट्रात युतीच्या जागा कमी होणार? Description: Lok Sabha 2019: देशातील राजकारणाच्या दृष्टीने सर्वांत मोठे राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशातील अंदाज जाहीर करण्यात आले आहेत. त्यात भाजपला समाजवादी पार्टी आणि बसपा महाआघाडीचा मोठा दणका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles